चिपळूणात यंदा गरबा नाहीच ; मंडळांचा निर्णय

this year navratri festival not celebrated in chiplun city the decisions take by a youth mandal for precaution of corona
this year navratri festival not celebrated in chiplun city the decisions take by a youth mandal for precaution of corona
Updated on

चिपळूण : कोरोना टाळण्यासाठी गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय सार्वजनिक उत्सव मंडळांकडून घेण्यास सुरवात झाली आहे. चिपळुणातील अनेक मंडळांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासह गरबाही रद्द केल्याची माहिती खेर्डीतील राजस्थानी मित्र मंडळाचे सदस्य विष्णू गहलोत यांनी दिली. तालुक्‍यातील इतर मंडळेही असाच निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात राज्यशासनाने नियमावली तयार करून ती लागू केली होती, असे असले तरी अनेक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला होता तर इतर मंडळांनी नियमावलीचे पालन करत साधेपणाने उत्सव साजरा केला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. या उत्सवामध्ये गरब्याचे ठिकठिकाणी आयोजन होते आणि त्या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी तरुणाईसह नागरिक मोठ्या संख्येने येतात. याशिवाय गरबा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते.

काविळतळी येथील ओंकार मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाला ३३ वर्षांची परंपरा आहे. या मंडळातर्फे यावर्षी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य संदीप चिपळूणकर यांनी दिली. मार्कंडी येथील सचिन कदम मित्रमंडळातर्फे दरवर्षी मोठा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव यंदा कोरोनामुळे शासनाच्या नियमावलीनुसार साजरा केला जाईल, अशी माहिती मंडळाचे सदस्य बाळा आंबुर्ले यांनी दिली. 

"चिपळुणात वाढणारी रुग्णसंख्या पाहता सर्वांनी सावधगिरी पाळली पाहिजे. नवरात्रोत्सवात एकत्र भेटणे, दर्शनाला एकत्र येणे धोकादायक ठरू शकते. मृत्यूदर घटला असला तरी रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करावा."

 - देवेंद्र पोळ, पोलिस निरीक्षक चिपळूण

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
Marathi News Esakal
www.esakal.com