सिंधुदुर्गमध्ये बेकायदा दारू वाहतुकीवर यंग ब्रिगेडचे 'सर्जिकल स्ट्राईक' ; 'टास्क फोर्स'ची निर्मिती...

young brigade surgical strike on illegal alcohol transport in sindhudurg creation of task force ...
young brigade surgical strike on illegal alcohol transport in sindhudurg creation of task force ...

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांची करडी नजर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत आतापर्यंत ३२ कारवाई करत तब्बल १ कोटी ४५ लाख २७ हजार ९२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे बेकायदा दारू व्यवसयिकांचे धाबे दणाणले आहेत. गोवा-सिंधुदुर्ग सीमा सील करण्यात आल्याने दारू व्यावसायिक सीमेवरील अडमार्गांचा वापर दारू वाहतुकीसाठी करत आहेत. दैनिक 'सकाळ'ने लॉकडाऊन काळात बेकायदा दारू सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशानुसार सीमेवर पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली.


 गोवा बनावटीच्या दारूला सिंधुदुर्ग जिल्यासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा येथे मोठी मागणी असते. विशेषतः गोवा फेणी व काजू बोंडापासून बनविण्यात येत असलेल्या हुराक ची मागणी ही लॉकडाऊन काळात वाढली आहे. या दारू वाहतुकीमागे आंतरराज्य साखळी कार्यरत आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत ३० लाख ८३ हजार ९२२ रुपये किमतीची दारू व १ कोटी १४ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


 कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. भरतातदेखील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. पहिल्या दोन लॉकडाऊन मध्ये बियर व वाईन शॉप पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. गोव्यातील बार देखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सीमेवरील बार मधून छुप्या पद्धतीने गोवा बनावटीची दारू वाहतूक सुरू होती.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात केवळ अत्यावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनानाच प्रवेश देण्यात येत होता.

मात्र माघारी परतताना याच वाहनांनमधून दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याचे तपासणी नाक्यावरील पोलिसांच्या निदर्शनास आले. सीमेवरील तपासणी नाक्यावर वाहनांच्या कडक तपासणीत बेकायदा दारू वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला. परराज्यातील व परजिल्ह्यातील अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली. सीमेवर कारवाई होत असल्याने दारू व्यावसायिकांनी आडमार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली. बांदा पोलिसांनी या चोरवाटांवर २४ तास गस्त सुरू केली. बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी सीमेवर गाळेल व डेगवे येथे तपासणी नाके सुरू केले. संशयास्पद वाटणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू करण्यात आली.

हेही वाचा- पुन्हा आख्खा मसूरची  चव चाखायला यावे... पहा कुठे  | ​
     यंग ब्रिगेडचे 'सर्जिकल स्ट्राईक'
लॉकडाऊन कालावधीत दारू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी बांदा पोलिसांच्या यंग ब्रिगेडने मोहीमच उघडली आहे. थेट गोव्यात दारू वाहतूक होणाऱ्या वाहनांची माहिती मिळवून त्यानुसार सिंधुदुर्ग हद्दीत सापळा रचून ही यंग ब्रिगेड कारवाई करत आहे. यामध्ये मनीष शिंदे, राजेंद्र शेळके, दादासो पाटील, विजय जाधव, महेश भोई, धनंजय गोळे, प्रशांत पवार, बाळकृष्ण गवस या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रात्र-रात्र पाळत ठेवून या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे दारू व्यवसयिकांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वी याच यंग ब्रिगेडने कँटरवर कारवाई करत तब्बल ३२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता.

   दारू कारवाईसाठी 'टास्क फोर्स'
   गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर आमची करडी नजर आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा दारू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी 'टास्क फोर्स'ची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळेच लॉकडाऊन काळात विविध कारवाई करून दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे. भविष्यात बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
--- अनिल जाधव, पोलीस निरीक्षक, बांदा पोलीस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com