रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २४) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली; मात्र तो विहिरीत कसा पडला, याचा तपास पोलिस (Ganpatipule Police) करत आहेत. ओंकार अनिल दुर्गवळी (वय २६, रा. मालगुंड दुर्गवळीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.