Malvan Accident: वागदे मोटार अपघातात पेंडूर येथील तरुण ठार; एक जखमी, नेमकं काय घडलं..

पेंडूर (ता. मालवण) येथून कणकवली येथे येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-डंगळवाडी येथे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (वय ३२, रा. पेंडूर) हा युवक जागीच ठार झाला.
Scene of the Vagade accident where a Pendhur youth tragically lost his life; car severely damaged in the crash.
Scene of the Vagade accident where a Pendhur youth tragically lost his life; car severely damaged in the crash.Sakal
Updated on

कणकवली : पेंडूर (ता. मालवण) येथून कणकवली येथे येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-डंगळवाडी येथे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (वय ३२, रा. पेंडूर) हा युवक जागीच ठार झाला. सोबतचा उदय बाबाजी पवार (वय ३२, रा. पेंडूर, मूळ नरडवे) हा जखमी असून, त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मयुरेश हा पुणे येथे नोकरीला होता. काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. उद्या (ता. ५) तो पुणे येथे जाणार होता. सोबत असलेला उदय हा मूळचा नरडवेचा (ता. कणकवली) असून, तो पेंडूर येथे मामाजवळ राहत होता. मयुरेश हा त्याचा मामेभाऊ होता. दोघेही पेंडूर येथून कामानिमित्त मोटारीने कणकवलीला येत होते. मात्र, वागदे येथे त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघातात मयुरेशचा मृत्यू झाला. तर उदयच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर घाबरलेला उदय बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नेमका अपघात कसा झाला? याची माहिती मिळू शकली नाही.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव, नवराज झेमणे, सागर मुळे, दीपक पवार, अविनाश पाटील, प्रद्युम्न मुंज, अमित भोसले, दर्पण वणवे आदींसह नातेवाईक व मित्रमंडळींनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तसेच कणकवलीचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत, वाहतूक पोलिस आर. के. पाटील, भूषण सुतार, शंकर पार्सेकर आदी पोलिस उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले होते. अपघातानंतर मयुरेशचा मृत्यू झाल्याने मित्र परिवारामधून हळहळ व्यक्त केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com