मालवण : तारकर्ली येथील एमटीडीसी समोरील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेणाऱ्या सातारा येथील सहा पर्यटक तरुणांमधील तिघे जण समुद्रात बुडाल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यामध्ये ओंकार अजित शेलार (वय २४, रा. सातारा) व आकाश रामदास बेबले (वय २४ रा. सातारा) या दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे हा समुद्रात बेपत्ता झाल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मृतदेह समुद्र किनारी आढळला.