पार्टीला गेले आणि अडकून पडले तब्बल अठरा युवक अन्..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Youth Birthday Celebration In Malvan Kokan Marathi News

चिवला बीच समोरील समुद्रातील कवडा रॉक बेटावर मौजमजेस गेले हे युवक आणि  आला सोसाट्याचा वारा..... 

पार्टीला गेले आणि अडकून पडले तब्बल अठरा युवक अन्.....

मालवण (सिंधुदूर्ग) : चिवला बीच समोरील समुद्रातील कवडा रॉक बेटावर मौजमजेस गेल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेटावर अडकून पडलेल्या सर्व युवकांना सर्जेकोट येथील स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तब्बल 18 तासानंतर किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.युवकांना सुखरूप किनाऱ्यावर आणलेल्या सर्जेकोट येथील धाडसी मच्छीमारांचा आज तहसील कार्यालयात प्रात वंदना करमाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा-  व्हिडिओ - कहरच ; भर सभेतच नगरसेवकाची घेतली पप्पी आणि... -

कवडा रॉक  बेटचा आनंद पडला महागात 

चिवला बीच येथील खोल समुद्रात कवडा रॉक हे बेट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या बेटावर शहरातील एका मित्राच्या पार्टीसाठी 19 युवक काल सकाळीच कवडा रॉकवर गेले होते. मात्र सांयकाळी माघारी परतत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्यांना माघारी परतणे अशक्‍य बनले. यात रात्री उशिरा आठ जण माघारी परतण्यात यशस्वी ठरले तर 11 जण बेटावरच अडकून पडले. या प्रकाराची माहिती मिळताच सर्जेकोट येथील स्थानिक मच्छीमारांनी त्यांना किनाऱ्यावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना त्यात यश मिळाले नाही.

हेही वाचा- Union Budget 2020 :  केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये औद्योगिक वसाहतींची मंदी होईल का दूर..?

पोहता न आल्यामुळे.....

बेटावर अडकलेल्या काहीजणांना पोहता येत नसल्याने समस्या निर्माण झाली होती. आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान वाऱ्याचा वेग काहीसा मंदावल्याने सर्जेकोट येथील स्थानिक मच्छीमारांनी मोठ्या नौकेने कवडा रॉक गाठले. बेटावर अडकलेल्या उर्वरित 11 जणांना नौकेत घेत सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले. या मोहिमेत शंकर मुंबरकर, प्रसाद पाटील, हेमंत पाटील, गिरीश सावजी, राजेंद्र मुंबरकर, दशरथ पराडकर, जगदीश पराडकर, परेश फोंडबा आदी सहभागी झाले होते. दरम्यान सर्जेकोट मधील या धाडसी मच्छीमारांचा आज तहसील कार्यालयात प्रांत वंदना करमाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे हे देखील उपस्थित होते.  

Web Title: Youth Birthday Celebration Malvan Kokan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..