
औद्योगिक वसाहतींमध्ये अजूनही प्रचंड मंदी उद्योगाची चक्रे गतिमान करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये हवी भरीव तरतूद......
उजळाईवाडी (कोल्हापूर) : नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मंदीच्या कचाट्यात सापडलेले औद्योगिक वसाहतीतील उद्योग अद्यापही तीस टक्के मंदीच्या छायेत आहेत. राज्याच्या इतर औद्योगिक वसाहतीतील परिस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांची सृजनशीलता, जिद्द, चिकाटी, परस्पर सहकार्य व सचोटी या पंचसूत्रीमुळे अत्यंत बिकट मंदीच्या काळातही ही उद्योजक आपल्या उद्योगात तग धरून आहेत. अजूनही औद्योगिक वसाहतीमध्ये तीस टक्के मंदी असल्याने महावितरणकडून शिफारस केलेली वीज दरवाढ म्हणजे बुडत्याचा पाय आणखीन खोलात अशी अवस्था होणार आहे .
हेही वाचा- ...त्यामुळे झाला ‘सायलेंट किलर’पत्नीचा पर्दाफाश
मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या उद्योजकांना.....
त्यामुळे संभाव्य वीज दरवाढ रद्द करावी .त्याच बरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तात्पुरते स्थगित केलेले सेवाशुल्क रद्द करणे व मुंबई व पुणे येथील उद्योग भौगोलिक आणि आर्थिक दृष्ट्या सुस्थिर असून किमान वेतन निश्चिती करताना कोल्हापुरातील उद्योगांची पुण्या-मुंबईच्या उद्योजकांची तुलना न करता येथील आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून किमान वेतन दर सदर औद्योगिक वसाहतीच्या तुलनेत कमी असणे व्यवहार्य ठरेल त्यामुळे हे दर पूर्वीप्रमाणेच असावेत. सदरच्या उपाय योजना कोल्हापूरातील मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या उद्योजकांना साठी संजीवनी देणार्या ठरणार आहेत.
हेही वाचा- कोल्हापूर थरार; फायरिंग तो हमारे लिए कुछ नयी बात नहीं
१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये खालील तरतुदी अत्यावश्यक आहेत.
१) प्राप्तिकराची किमान मर्यादा कमीत कमी ५ लाख असावी
२) वाहनावरील घसारा वाढविला जावा.
३) शेतकरी संबंधित योजना येणे आवश्यक आहे.
४) ए आय आर इंडिया सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात निर्गुंतवणूकीस गती मिळावी.
५) पायाभूत सुविधा वर उदा. रस्ते व लहान विमानतळ यावर खर्च वाढविणे आवश्यक आहे.
६) लघुउद्योजकांना कर भरण्याच्या मुदतीत वाढ करावी.
७) भागीदारी व्यवसायातील उद्योजकांना प्राप्तिकराची मर्यादा ३० टक्के वरून २५ टक्के करावी
८) वाहन उद्योगावर ४३ टक्के कर असून त्यामध्ये कपात करावी.
९)सरकारने आजारी उद्योगांचे पुनर्वसन करावे.
१०)नवीन कर्जासह सध्याच्या व्याजात दीड टक्का सवलत द्यावी.
अर्थसंकल्पामध्ये वाहन उद्योगाला तरतूद
कोल्हापुरातील औद्योगिक वसाहती ह्या वाहन उद्योगावर निर्भर असून मंदीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसला असून वाहन उद्योगाला सावरण्यासाठी विशेष तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये होणे अत्यावश्यक आहे.सचिन शिरगावकर,अध्यक्ष गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन