कोल्हापूर : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी (Ganpatipule Tourism) आलेल्या कोल्हापुरातील एका तरुणाचा भंडारपुळे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. इरफान झाकीरहुसेन जमादार (वय ३४, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.