भयंकर! भरचौकात स्वतःच्यात गळ्यावर ब्लेडने केले सपासप वार

Youth suicide attempt dodamarg konkan sindhudurg
Youth suicide attempt dodamarg konkan sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वझरे येथील शरद विष्णू शिरोडकर (वय 35) या युवकाने येथील बाजारपेठेतील चौकात दारूच्या नशेत स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी घडली. रक्तबंबाळ अवस्थेत तो चौकात कोसळला; मात्र प्रसंगावधान राखत स्थानिक व्यापारी व गृह रक्षक दलाच्या जवानाने त्याला तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे अनर्थ टळला. 

दरम्यान, त्याच्यावर उपचार करून त्याला पुढे रेफर करण्यात आले होते; मात्र तो घरी गेला. हवालदार अनिल पाटील यांनी घरी जाऊन माहिती घेतली. विशेष म्हणजे शरदने यापूर्वी दोन ते तीन वेळा दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपल्याला जगायचे नाही आणि दोडामार्गमध्येच मरायचे आहे, असे म्हणत त्याने हनुवटीखाली गळ्यावर ब्लेड ओढून घेतले. यात त्याला दोन ठिकाणी कापले गेले.

रक्तबंबाळ अवस्थेत शरद याला बेकरी व्यावसायिक दादा करमळकर, पोलिस मित्र पिकी कवठणकर, होमगार्ड श्री. ताटे व अन्य काहींनी तत्काळ त्याला गाडीत घालून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या गवस आणि डॉ. अक्षय काळे यांनी उपचार केले. त्याच्या गळ्यावर दोन ठिकाणी चिरले गेले आहे. एका ठिकाणी पाच तर एका ठिकाणी दोन टाके घालण्यात आले. दुसरीकडे ब्लेड नुसतेच ओढले गेले आहे. दोडामार्ग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात जावून माहिती घेतली. 

दरम्यान, वझरे सरपंच लक्ष्मण गवस यांनी शरदने यापूर्वीही दोन तीन वेळा असाच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो चांगला कूक आहे. शिवाय त्याचे भाऊ व अन्य कुटुंबीय त्याची देखभाल करतात. तो अविवाहित आहे. त्याने हा प्रकार केला तो बेरोजगारी अथवा नैराश्‍यातून केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. शरद आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याने पूर्वीप्रमाणेच उत्कृष्ट कूक म्हणून नाव कमवावे, अशी भावना व्यक्त केली. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com