esakal | घाट रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात मग नाव आंबा घाट का?
sakal

बोलून बातमी शोधा

घाट रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात मग नाव आंबा घाट का?

घाट रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात मग नाव आंबा घाट का?

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

रत्नागिरी : कोल्हापूर (Kolhapur) या प्रमुख मार्गावर साखरपा,मुर्शी,दख्खन गाव सोडल्यावर कोकण आणि पश्चिमला जोडणारा आंबा घाट आहे. या घाटाचा आणि आंबा गावाचा तसा संबध येत नाही कारण रत्नागिरी जिल्हा हद्द आंबा गावाच्या आधी संपते.असे असताना या घाटाला आंबा घाट हे नाव कसे ?असा सवाल देवरुखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी उपस्थित केला आहे.

हा घाट दख्खन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो.आंबा घाटाची जबाबदारी बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा घेते.साखरपा मुर्शी व देवरुख पोलीस स्टेशन या क्षेञातील तपासकाम हाताळते.हा घाट रत्नागिरी जिल्ह्याची शान असताना हद्द नसलेल्या गावाच्या नावाने हा घाट प्रसिद्घ कसा ? या घाटाला खरेतर आपण दख्खनचा घाट असेच म्हणावे असे मत आर्ते यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- राणेंना कॅबिनेट मंत्रीपद हा कोकणाचा सन्मान; बाळ माने

पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करणार्‍या नागरिकांना आंबा घाट निसर्ग संपदेने भुलवतो. वेड्या वाकड्या वळणांचा व हिरव्यागर्द झाडीने नटलेला हा घाट मजबुतीच्या दृष्टीनेही सक्षम आहे. समुद्रसपाटीपासुन २००० फूट उंचीवर हा घाट सह्याद्री पर्वत रांगेचा एक भाग आहे.या घाटातील गायमुख हे बारमाही पाणी वाहणारे ठिकाण प्रसिद्घ आहे.या घाटातुन विशाळगडाची टेहळणी करता येते असा पाॅइंट आहे. घाटातुन पूर्वी घोडेसवारी होत होती तेंव्हा घोड्यांना पाणी पिण्यासाठी खास तळेही बांधण्यात आलेले आहे. या तळ्याची स्वच्छता देवरुखमधील काकडे अॅकॅडमी करत असते.

दख्खन,मुर्शी,कळकदरा ग्रामस्थांना या घाटाचा विशेष अभिमान आहे.या घाटाला आंबा घाट न म्हणता दख्खनचा घाट असे नामकरण होणे महत्वाचे आहे असे आर्ते यांनी आपले मत व्यक्त केले आहे.या घाटाला आंबा घाट हे नाव कोणी,कधी दिले याचाही तपास या निमित्ताने होवु शकतो असे आर्ते यांनी मत व्यक्त केले.

loading image