वैभव मांगलेंवर झी मराठीचा विश्वास ; कोकणातील कलाकारांना सिरीयलमध्ये मिळाली काम करण्याची संधी.....

Zee Marathi on Vaibhav Mangle ek daav bhutacha new Serial shuting on ratnagri
Zee Marathi on Vaibhav Mangle ek daav bhutacha new Serial shuting on ratnagri

साडवली (रत्नागिरी) : लाॅकडाउन काळात मराठी रंगभूमी,चिञपटसृष्टी शांत होती माञ रत्नागिरी जिल्ह्यात सर्व नियम पाळुन कलाकारांची धावपळ सुरु होती व या धावपळीतुन एक नवा इतिहास घडला गेला व झी मराठी या लोकप्रिय टिव्ही चॅनलने रत्नागिरीच्या कलाकारानां एक नवी संधी दिली व प्रसिद्घ अभिनेते वैभव मांगले यांच्या वर नवी जबाबदारी देवून चक्क एका नव्या सिरीयलची जबाबदारी सोपवली व ती आज १८ तारखेला एपिसोड जाहीर करुन सिद्ध करुन दाखवली..होय याच सिरीयलचे नाव एक गाव भुताचा...संपुर्ण जिल्हावासियांना अभिमान वाटेल अशीच कामगिरी आज सर्वांसमोर आली आणि वैभव मांगलेंनी उचललेले शिवधनुष्य आमच्या कलाकारांनी सहज पेलुन दाखवले.


लाॅकडावून काळात कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांना चैन पडत नव्हता.यातच अभिनेते वैभव मांगले गावी आलेले होते.त्यांनी आपल्या कलाकारांसाठी काहीतरी करायला हवे हा ध्यास घेतलेला होता.यातुनच झी मराठी चॅनलने वैभवना काहीतरी नवीन करा अशी आॅफर दिलेली होती याच संधीचा फायदा मांगलेंनी घेतला व एक गाव भुताचा ही रत्नागिरीत बनलेली सिरीयल प्रेक्षकांसमोरआली व तीने सार्‍यांचे प्रेम मिळवले.

नवीन सिरीयलचा झाला जन्म

यासाठी मंञीमहोदय व सांस्कृतिक चळवळीला पाठींबा देणारे मंञी उदय सामंत यांनी पुर्ण पाठींबा दिला.जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी हिरवा सिग्नल दिला व कलाकारांना पुर्ण स्वातंञ्य दिले व एक नवा इतिहास घडला व नवीन सिरीयलचा जन्म झाला.यासाठी भोसले निर्माता म्हणुन पुढे आले.सुनिल बेंडखळे,प्रफुल्ल घाग,व राजेंद्र घाग यांना सोबत घेवून वैभव मांगलेंनी हे धाडस करायचे नक्की केले.

 या कलाकारांनी निभावली भुमिका

भोसले निर्माता व कार्यकारी निर्माता म्हणुन म्हणुन प्रफुल्ल घाग,लेखक राजु घाग,कॅमेरामन प्रसाद पिलणकर,व दिग्दर्शक व एडीटींगची जबाबदारी निखिल पाडावे यांनी पार पाडली.
कलाकारांची निवड करताना अनुभवी व कसलेले कलाकार यामध्ये सहभागी झाले.या कलाकारांमध्ये स्वतःवैभव मांगलेंसोबत प्रफुल्ल घाग,अमोल रेडीज,प्रभाकर डावूल,सुनिल बेंडखळे,सचिन काळे,वैदेही पटवर्धन,ऐर्श्वया पाटील,रक्षिता पालव,अर्चना पांचाळ,गजानन पांचाळ,स्वानंद गाडगीळ,समीर इंदुलकर,विनोद वायंगणकर,अर्चना जोशी,अनुया बाम,राजेश गोसावी,ऋषिकेश शिंदे व सहकारी कलाकारांना यामध्ये संधी मिळाली आहे.

रत्नागिरीत झाले शुटिंग
रत्नागिरी सारख्या ठिकाणी ही सिरीयल तयार झाली हेच विशेष आहे. त्यासामुग्रीसह एव्हढी चांगली कलाकृती सादर करणे हे आव्हान होते व सर्वांनी ते स्विकारले आहे.यामध्ये अजुन शंभर लोकांची नामावली आहे.सर्वांनी चांगले सहकार्य केले आहे.विविध कथाभागातुन आपल्याला ही भुतांची सिरीयल एक वेगळा अनुभव देणारी ठरणार आहे.आपणही या सर्वांचे मनापासुन स्वागत केले आहे हे विशेष आहे.झी मराठीने टाकलेला विश्वास व वैभव मांगले यांची मेहनत नक्कीच यशस्वी होणार आहे.नाचणेवासियांचे सहकार्य पहील्या भागासाठी मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com