मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांची आत्तापासून फिल्डिंग : जिल्हा परिषद, पंचायत समितीची धूम : Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

आगामी वर्षातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी आतापासूनच गट-गणात संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे.

Konkan : मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांची आत्तापासून फिल्डिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (Zilla Parishad Panchayat Samiti)निवडणुका नव्या वर्षामध्ये होणार असून त्यापूर्वीच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आपापले गट आणि गणांमध्ये मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या स्वरूपांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने आतापासूनच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत.

आगामी वर्षातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी आतापासूनच गट-गणात संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन करण्यासह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून गावोगावच्या ग्रामस्थांच्या बैठका घेण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार बरसण्यास सुरवात झाली आहे. काहींनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्षही उमेदवार म्हणूनही लढण्याची तयारी सुरू केली आहे.

कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली

प्रशासकीय स्तरावरही निवडणुकीच्यादृष्टीने गट आणि गणांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कुठल्या गट आणि गणामध्ये किती लोकसंख्या आहे, किती गावे आहेत, लोकसंख्या वाढलेली असल्यास गट वा गणाची संख्या वाढणार आहे का, लोकसंख्या घटलेली असल्यास आहे, त्या गट वा गणांची संख्या घटणार आहे का? याची चाचपणी केली जात आहे.

हेही वाचा: घाटमाथ्यावर वातावरण तापलं; 'सात' गावांत निवडणुकीचे धूमशान

दृष्टिक्षेपात राजापूर तालुका

जिल्हा परिषद गट ः ६ (ओणी, पाचल, केळवली, कोदवली, देवाचेगोठणे, सागवे)

पंचायत समिती गण ः १२ (ओणी, ओझर, पाचल, ताम्हाणे, केळवली, कोंड्येतर्फ सौंदळ, कोदवली, भालावली, देवाचेगोठणे, साखरीनाटे, अणसुरे, सागवे)

कोणते आरक्षण पडणार?

कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार? याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी, मागील दोन निवडणुकीच्यावेळचे आरक्षण लक्षात घेऊन पुढील म्हणजे संभाव्य आरक्षणाचे इच्छुक उमेदवारांकडून आराखडे बांधले असून इच्छुकांनी आपापल्या मतदार संघात मोंर्चेबांधणी सुरू केली आहे.

loading image
go to top