Gram Panchayat Elections 2021: घाटमाथ्यावर वातावरण तापलं; 'सात' गावांत निवडणुकीचे धूमशान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayt elections.jpg

घाटमाथ्यावर वातावरण तापलं; 'सात' गावांत निवडणुकीचे धूमशान

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

घाटनांद्रे (सांगली) : कवठेमंकाळ (Kavathe Mahankal ) तालुक्याच्या घाटमाथ्यावरील तिसंगीसह विठूरायाचीवाडी, रामपूरवाडी, बोरगाव, अग्रणधुळगाव, दुधेभावी व कोंगनोळी या सात गावात (प्रत्येकी एक) सात जागांसाठी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका (Gram Panchayat Elections) होत आहेत. या गावात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कवठेमंहाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील तिसंगीसह अन्य सहा गावांत ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर तिसंगीसह उर्वरित गावात राजकीय हालचालीना वेग आला आहे. उमेदवारांच्या चाचपणीसाठी बैठका सुरू झाले आहेत. तिसंगी ग्रामपंचायतवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीचे ९ सदस्य आहेत. त्यापैकी एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. मतदानाला अद्याप कालावधी असला तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हेही वाचा: जिल्हा बँक निवडणूकीचे पुन्हा बिगुल वाजले ; उच्च न्यायालयाचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :- अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनामध्ये सुधारणा करणे ता.२२ नोव्हेंबर, तहसीलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणे ता.२३ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्रे मागवणे व सादर करणे ता. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, ७ डिसेंबर नामनिर्देशनपत्र मागे घेणे व यादी प्रसिद्ध करणे ९ डिसेंबर, मतदान ता.२१ डिसेंबर ,मतमोजणी ता.२२ डिसेंबर मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून निवडणूक निकाल अधिसूचना प्रसिद्ध करणे २७ डिसेंबर २०२१.याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे.कोणत्या ग्रामपंचायतवर कोण उमेदवार विजयी होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

loading image
go to top