IPL 2027 TRADE: हार्दिक पांड्याला ट्रेड करताय का? CSK, KKR सोडून आणखी ३ फ्रँचायझी उतरल्या शर्यतीत; Mumbai Indians म्हणते...

Hardik Pandya Trade Update: IPL 2027 Trade: हार्दिक पांड्याच्या ट्रेडच्या चर्चेने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये जोर पकडला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक असल्याची चर्चा आहे.
Hardik Pandya IPL 2027 trade latest update

Hardik Pandya IPL 2027 trade latest update

esakal

Updated on

Hardik Pandya IPL 2027 trade latest update: हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी हा ऑल राऊंडर मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) साथ सोडून कोणत्या संघात जातो, याची उत्सुकता आहेच... कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स, हे दोन माजी विजेते संघ सध्या आघाडीवर आहेत. पण, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपटिल्स यांनीही या शर्यतीत सहभाग घेतल्याचे वृ्त्त समोर येत आहे. पण, मुंबई इंडियन्सचा काय निर्णय झालाय, तेच अद्याप कळेनासे झालेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com