esakal | विम्बल्डनमध्ये वर्ल्डकपला प्रवेशबंदी, तरीही...
sakal

बोलून बातमी शोधा

Football World Cup banned in Wimbledon Final

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होत असतानाच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत इंग्लंड खेळणार आहे. मात्र, वर्ल्डकपला विम्बल्डनमध्ये प्रवेश नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले. 

विम्बल्डनमध्ये वर्ल्डकपला प्रवेशबंदी, तरीही...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होत असतानाच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत इंग्लंड खेळणार आहे. मात्र, वर्ल्डकपला विम्बल्डनमध्ये प्रवेश नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले. 

विम्बल्डन स्पर्धेच्या ठिकाणच्या मेगा स्क्रीनवर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील लढतीचे थेट प्रक्षेपण होणार नसल्याचे स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड लुईस यांनी स्पष्ट केले. त्यांनी बिग स्क्रीनचा कोणताही त्रास खेळाडूंना होऊ नये हेच आमचे लक्ष्य आहे, असेही स्पष्ट केले. विम्बल्डनची पुरुष एकेरीची अंतिम लढत सुरू झाल्यानंतर दोन तासांत विश्‍वकरंडकातील अंतिम लढत होणार आहे. 

रविवारी सेंटर कोर्टवर अंतिम लढत सुरू असताना प्रेक्षक विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीकडेही लक्ष ठेवून असतील, असे लुईस यांनी सांगितले. कदाचित टेनिस लढतीत काहीही घडलेले नसताना टाळ्यांचा कडकडाट किंवा भावना चाहत्यांकडून व्यक्त होतील, असेही ते म्हणाले. 
गेल्या शनिवारी इंग्लंड-स्वीडन लढत होती. त्या वेळी फुटबॉल टेनिसपेक्षा किती लोकप्रिय आहे, याचा अनुभव आला. अँगेलिक केर्बर आणि नाओमी ओसाका या महिला एकेरीतील लढतीच्या वेळी स्टेडियम जवळपास रिकामे होते. टेनिस कोर्टवर असलेल्या चाहत्यांचे लक्षही फुटबॉल लढतीकडेच होते. चाहत्यांनी एकाच वेळी दोन खेळाचा आनंद घेतला होता. 

1996 च्या स्पर्धेतून धडा 
1996 मध्ये विम्बल्डन सुरू असतानाच युरो स्पर्धा सुरू होती. त्या वेळी संयोजकांनी इंग्लंड-जर्मनी लढत बिग स्क्रीनवर दाखवली. त्यामुळे टेनिसचा आनंद घेता आला नाही, अशी तक्रार संयोजकांकडे करण्यात आली होती. त्यामुळे चाहते त्यांच्याकडील मोबाईलवर फुटबॉल सामना पाहतील; तर प्रत्यक्ष टेनिस लढतीचा आस्वाद घेतील, असे ठरले. 

मला विश्‍वकरंडकाची अंतिम लढत खेळणाऱ्या खेळाडूंची चिंता वाटत आहे. ही लढत सुरू असताना अचानक त्यांचे लक्ष लव्ह 15, 15-30 कडे वेधले जाईल. प्रेक्षक काय म्हणत आहेत, याकडे फुटबॉलपटू बघत राहतील. त्यांना विम्बल्डनवर नेमके काय सुरू आहे, तेही कळणार नाही. 
- रॉजर फेडरर