esakal | मेस्सीच्या डोळ्यांदेखत अर्जेंटिनाचा धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

मेस्सीच्या डोळ्यांदेखत अर्जेंटिनाचा धुव्वा

मेस्सीच्या डोळ्यांदेखत अर्जेंटिनाचा धुव्वा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माद्रिद - दुखापतीमुळे विश्रांती घेतल्याने प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहणाऱ्या लिओनेल मेस्सीला आपल्या अर्जेंटिना संघाचा दारुण पराभव पाहण्याची वेळ आली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी सुरू असलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात बलाढ्य स्पेनने हा सामना तब्बल ६-१ असा जिंकला, तर दुसरीकडे नेमारशिवाय खेळणाऱ्या ब्राझीलने विश्‍वविजेत्या जर्मनीला १-० असा धक्का दिला.

बार्सिलोना आणि रेआल माद्रिद या क्‍लबचे काही प्रमुख खेळाडू स्पेनचे हुकमी खेळाडू आहेत. फ्रान्सिस्को इस्कोने हॅट्‌ट्रिक केली. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संभाव्य संघ निवडण्यापूर्वी अर्जेंटिनाचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षकांसमोरचे आव्हान आता अधिकच वाढेल.

‘विश्‍वकरंडक विजेतेपदाचा हिशेब बाकी आहे,’ असे विधान एक दिवस अगोदर मेस्सीने केले होते; पण त्याच्या अनुपस्थितीत अर्जेंटिनाचा संघ स्पेनसमोर टिकावही धरू शकला नाही. अर्जेंटिनावरील दणदणीत विजयानंतर  प्रशिक्षक लोपेटगुई यांनी आपल्या संघाला शाबासकी दिली; पण हा तयारीचा सामना होता, याचीही जाणीव करून दिली. शून्यातून आपल्याला सुरवात करायची आहे, असे लोपेटगुई यांनी सांगितले.दिओगो कॉस्टा, थियागो अलकॅंटरा यांनी स्पेनकडून सुरवातीला गोल केले. त्या वेळी अर्जेंटिनाच्या निकोलस ओचामेंडीने स्पेनच्या गोलजाळ्याचा वेध घेतला. त्यामुळे मध्यांतराला गुणफलक २-१ असा होता. उत्तरार्धात स्पेनचे कमालीचे वर्चस्व राहिले.