अर्जेंटिनाच्या सरावाला 30 हजार चाहते

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 May 2018

ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. अर्जेंटिना संघाच्या हरकेन स्टेडियमवर सुरू असलेल्या सरावालादेखील तब्बल ३० हजारहून अधिक चाहत्यांची उपस्थिती होती. 

शालेय विद्यार्थ्यांपासून फुटबॉल क्‍लब, सर्वसामान्य नागरिक आणि संघात निवडलेल्या फुटबॉलपटूंचे जवळचे मित्र असे सर्वच जण आपल्या खेळाडूंचा सराव बघायला उपस्थित होते. 

मेस्सी, हिग्युएन, ओटामेंडी या आपल्या लाडक्‍या हिरोंचे वॉर्म-अप, ड्रिल्स, प्रॅक्‍टिस मुव्हज अशा तासभराच्या सरावाला हे सर्व उपस्थित होते.

सरावानंतर खेळाडूंनी उपस्थित चाहत्यांपैकी काही जणांना फुटबॉल आणि अर्जेंटिनाच्या जर्सी भेट दिल्या. या सराव सत्राला मात्र अर्जेंटिनाच्या मार्कोस अकुना याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, संघाचे वैद्यकीय पथक त्याच्यावर काळजीपूर्वक उपचार करत आहेत. अर्जेंटिना संघ आता एक निरोपाचा सामना खेळून पुढील सरावासाठी बार्सिलोना येथे जाणार आहेत. त्यानंतर ९ जून रोजी ते इस्राईलविरुद्ध मित्रत्वाचा अखेरचा सामना खेळतील आणि तेथूनच रशियाला रवाना होणार आहेत.

संघाची तयारी चांगली सुरू आहे. आता आम्ही निरोपाच्या सामन्याची वाट बघत आहोत. अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही अभिमानाची तर बाब आहेच. पण, आम्हाला चाहत्यांच्या अशा प्रोत्साहनाची अखेरपर्यंत गरज आहे.
- ख्रिस्तियन अन्साल्डी, अर्जेंटिनाचा बचावपटू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: argentina football competition