बेल्जियम मेट्रोत वाजले फ्रेंच फुटबॉल गीत!

वृत्तसंस्था
Thursday, 12 July 2018

ब्रुसेल्स, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बेल्जियमच्या फुटबॉलप्रेमींना आणखी एक धक्का बसला. सकाळी मेट्रोतून कामावर जाणाऱ्यांना फ्रान्सच्या फुटबॉल संघाते गीत ("फुटबॉल अँथम') एकावे लागले. याचे कारण ब्रुसेल्स आणि पॅरिस यांच्या मेट्रो प्राधिकरणात पैज लागली होती. बेल्जियम जिंकल्यास पॅरिस मेट्रो सेंट-लझार या स्टेशनवरील नाव "सेंट हॅजार्ड' असे बदलेल.

बेल्जियमचा धडाकेबाज मध्यरक्षक एडन हॅजार्ड याच्या सन्मानार्थ हा तात्पुरता बदल करायचा होता. त्याचवेळी फ्रान्सची सरशी झाली तर सकाळी आठ आणि दहा वाजता "तुस असांब्ले' हे गीत ऐकवायचे अशी ही पैज होती. हे प्रसिद्ध गीत फ्रान्सचा रॉकस्टार जॉनी हॅलिडे याने रचले आहे. "सोशल मीडिया'वरून ही पैज लागली होती. बेल्जियमच्या पराभवामुळे मेट्रो प्राधिकरणाला हे गीत लावावे लागले. त्यांच्यासाठी दिलासा देणारी एकच बाब म्हणजे जॉनीचे वडील बेल्जियन होते. गेल्या वर्षी जॉनीचे निधन झाले. त्या वेळी मध्य ब्रुसेल्समधील "ग्रॅंड प्लेस' या जगप्रसिद्ध चौकात ध्वनीवर्धकावर तसेच ट्रेनमध्ये जॉनीच्या "हिट' गाणी लावण्यात आली होती.

जॉनी हॅलिडे याचे मूळ नाव जीन-फिलिपे लिओ स्मेट असे होते. त्याने 23 एप्रिल 2002 रोजी हे गीत लॉंच केले. त्याच वर्षी झालेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी फ्रेंच फुटबॉल संघाचे हे अधिकृत गीत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgium metro plays French football anthem