संघाला महत्त्व देणारे खेळाडूच आता विश्‍वकरंडक स्पर्धेत!

वृत्तसंस्था
Monday, 9 July 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल.

मॉस्को : विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल.

हमखास विजय देणारे जर्मन कार्ड या स्पर्धेत चालले नाही. ब्राझीलचा सांबा निष्प्रभ ठरला. तसेच, स्पेनचा पास-ए-थॉन असलेला टिका-टाकाही. एवढेच कशाला फुटबॉल जगतातील स्टार असलेले लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना), ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) मायदेशी परतले आहेत. इटलीच्या अझ्झुरीला स्पर्धेचे तिकीटच नाकारले गेले. या परिस्थितीत कोणीही फार अपेक्षा न बाळगलेले संघ या स्पर्धेत आहेत.

आता इंग्लिश फिश आणि चिप्स की क्रोएशियाचा प्रसिद्ध फिश रिसोट्टो तसेच फ्रान्सचा विन एट फ्रॉमेज की बेल्जियम बिअर अँड वॅफल्स हा निर्णय काही दिवसांत होईल. सुरवातीस फ्रान्स आणि बेल्जियम ही पश्‍चिम युरोपीय शेजाऱ्यांतील लढत होईल, तर त्यानंतर थ्री लायन्स वि. वॅत्रेनी असा सामना रंगेल. स्पर्धेपूर्वी या उपांत्य लढतींची कोणी स्वप्नातही आशा बाळगली नसेल. जागतिक क्रमवारीत तिसरे असलेल्या बेल्जियमचे प्रतिस्पर्धी फ्रान्स जागतिक क्रमवारीत सातवे आहेत. बाराव्या स्थानी असलेल्या इंग्लंडची लढत टॉप ट्‌वेंटीमध्ये अखेरचे असलेल्या क्रोएशियाविरुद्ध होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best four players in football worldcup