Can not speak much; Otherwise the war against me says carlos queiroz
Can not speak much; Otherwise the war against me says carlos queiroz

'जास्त बोलू शकत नाही; अन्यथा माझ्याविरुद्ध युद्ध'

सारांन्स्क - "वार' पद्धतीचा अवलंब होऊनही लाल कार्ड मिळाले नाही, हे रोनाल्डोचे सुदैवच म्हणायचे. वास्तविक त्याची मैदानावरून हकालपट्टी व्हायला हवी होती. मी याविषयी जास्त बोलू शकत नाही. शेवटी हे माझ्याच देशाशी आणि एका खेळाडूशी संबंधित आहे. माझ्याविरुद्ध युद्ध छेडले जाऊ शकते, असे परखड वक्तव्य इराणचे प्रशिक्षक कार्लोस क्विरोझ यांनी केले. क्विरोझ मूळचे पोर्तुगालचे आहेत. 

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत "वार'वरून बरेच प्रश्‍न विचारण्यात आले. पूर्वी तंत्रज्ञानाअभावी चुका स्वीकारल्या जायच्या, पण आता ते मान्य नसल्याचे क्विरोझ म्हणाले. "पूर्वी आम्ही मानवी चुका स्वीकारल्या. तो खेळाचाच एक भाग होता. खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच चुका करतात. आता मात्र आपल्याकडे एक पद्धत आहे. ती उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहे. पाच-सहा लोक एका कक्षात बसून पद्धतीचा अवलंब करतात, पण काय घडते? जबाबदारी कुणीच स्वीकारत नाही. आपल्याकडे रग्बीसारखे व्हावे. जेव्हा "वार'चा अवलंब होतो, तेव्हा पंच त्या कक्षातील लोकांशी काय बोलतात हे लोकांना कळायला हवे. त्यामुळे माझ्यामते ही पद्धत योग्य ठरत नसल्याचे "फिफा' आणि अध्यक्ष जियान्नी इन्फंटिनो यांना मान्य आहे. हीच वस्तुस्थिती आहे. बऱ्याच तक्रारी येत आहेत.' 

पोर्तुगाल प्रशिक्षकांचा पाठिंबा 
या लढतीत रोनाल्डो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी याच्याप्रमाणेच त्याने पेनल्टी दवडली. पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंटोस यांनी त्याचे समर्थन केले. ते म्हणाले की, "ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मी समजू शकतो. जगातील सर्वोत्तम खेळाडूंनासुद्धा यास सामोरे जावे लागले. फारशी संधी नसताना काही करून दाखविणे शक्‍य नसते. खेळाडूंना नेहमी जिंकायचे असते. खराब खेळ इतरांपेक्षा त्यांना जास्त निराश करतो.'

रोनाल्डोची झोपमोड करण्याचा "कट' 
सामन्याच्या आदल्यादिवशी इराणच्या काही चाहत्यांनी पोर्तुगालचा संघ राहात असलेल्या हॉटेलबाहेर गर्दी केली. त्यांनी बराच गोंधळ केला. त्यामुळे रोनाल्डोने त्याच्या खोलीची खिडकी उघडली. आवाज कमी करावा असे त्याने चाहत्यांना मोठ्याने सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इराणच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरूनच अधिकाधिक देशबांधवांना हॉटेलपाशी येण्याचे आवाहन केल्याचीही चर्चा होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com