प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 July 2018

शिकागो - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा धमाका संपल्यानंतर जवळपास आठवड्यानंतर फुटबॉलची रंगत सुरू झाली. चॅंपियन्स करंडक पूर्वमोसम स्पर्धेत डॉर्टमुंडने इंग्लिश प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला. 

सामन्यातील एकमेव गोल मारिओ गोट्‌झने पेनल्टी किकवर केला. चार वर्षांपूर्वी याच गोट्‌झने जर्मनीच्या विश्‍वविजयात निर्णायक गोल केला होता; परंतु यंदा त्याला संघात स्थान नव्हते.

नव्या मोसमाची सुरुवात करण्यासाठी प्रशिक्षक गॉर्डिओला यांनी रियाद मार्हेझ आणि जर्मनीच्या लेरॉय सेन यांचा अपवाद वगळता तरुण खेळाडूंना संधी दिली; परंतु या सामन्यापूर्वी अगोदर एक सामना खेळलेल्या डॉर्टमंडने वर्चस्व मिळवणारा खेळ केला. त्यांच्या आक्रमणात चांगलीच धार होती.

गोट्‌झने केलेला निर्णायक गोल २८ व्या मिनिटाला झळकला. अमेरिकन ख्रिस्तियन पॉलिसीसला गोलक्षेत्रात अवैधपणे पाडल्यानंतर मिळालेली पेनल्टी किक गोट्‌झने सत्कारणी लावली. मार्हेझने आक्रमक चाली करून ठसा उमटवला; पण त्याचे रूपांतर गोलात झाले नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळलेले इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वच खेळाडू विश्रांती घेत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांनी नवोदित खेळाडूंना स्थान दिले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: champion karandak football competition