लिव्हरपूल अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 May 2018

रोम - लिव्हरपूलने रोमाचा कडवा प्रतिकार रोखत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लिव्हरपूलने दुसऱ्या टप्प्याची लढत २-४ गमावली खरी, पण पहिल्या टप्प्याच्या लढतीतील ५-२ विजयामुळे त्यांची ७-६ अशी सरशी झाली.

रोम - लिव्हरपूलने रोमाचा कडवा प्रतिकार रोखत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लिव्हरपूलने दुसऱ्या टप्प्याची लढत २-४ गमावली खरी, पण पहिल्या टप्प्याच्या लढतीतील ५-२ विजयामुळे त्यांची ७-६ अशी सरशी झाली.

लिव्हरपूल आता विजेतेपदाच्या हॅटट्रिकची संधी असलेल्या रेयाल माद्रिदला २६ मे रोजी आव्हान देतील. लिव्हरपूलने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली, पण त्यांनी २००७ नंतर प्रथमच हे साध्य केले. रोमाने लिव्हरपूलच्या क्षमतेचा कस पाहिला, पण ते ही लढत गमावतील, असे कधीही वाटले नाही. त्यांच्याकडे पहिल्या टप्प्यानंतर तीन गोलची आघाडी होती. त्यातच पूर्वार्धात दोन गोल करीत रोमा पुन्हा चमत्कार करणार नाहीत, याची खबरदारी घेतली.

रोमाने याच स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यात बार्सिलोनाविरुद्धची लढत १-४ गमावली होती, पण घरच्या मैदानावरील दुसरा टप्पा ३-० जिंकत सरस अवे गोलाच्या जोरावर बाजी मारली. लिव्हरपूलच्या स्वयंगोलद्वारे रोमाने खाते उघडले. नॅंगॉलन याने उत्तरार्धातील अखेरच्या टप्प्यात आठ मिनिटांत दोन गोल केले, पण विजय दुरावलाच. त्यामुळे प्रीमियर लीगमधील संघाने २०१२ नंतर प्रथमच चॅम्पियन्सची अंतिम फेरी गाठली.

1981 च्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती
    १९८१ च्या युरोपिय कपमध्ये लिव्हरपूल आणि रेयाल माद्रिद यांच्यात अंतिम लढत झाली होती, त्या वेळी लिव्हरपूलची सरशी
    लिव्हरपूल - रोमा लढतीत मिळून एकंदर १३ गोल. १९९८ च्या उपांत्य लढतीतील मोनॅको-युव्हेंटिस सामन्यातील दहा गोलचा विक्रम मोडीत
    रोमाने घरच्या मैदानावरील चॅंपियन्स लीगमधील गेल्या पाच सामन्यांत गोल स्वीकारला नव्हता, या वेळी २५ मिनिटांतच दोन गोल
    लिव्हरपूलचे या मोसमात २० अवे गोल. रेयाल माद्रिदच्या २०१३-१४ मधील विक्रमाची बरोबरी
    यंदाच्या चॅंपियन्स लीगमध्ये लिव्हरपूलचे ४० गोल. एकाच मोसमातील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत सध्या तिसरे. बार्सिलोना (४५, १९९९-००) अव्वल
    सॅदिओ मेन याचे दहा चॅंपियन्स लीग लढतीत नऊ गोल
    लिव्हरपूलच्या मोहंमद सालाह (१०), रॉबर्टो फिर्मिनो (१०) आणि मेन यांचे एकत्रित २९ गोल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: champion league football competition