इंग्लंडच्या "सोप्या' मार्गावर कोलंबियाचा स्पीडब्रेकर? 

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

इंग्लंडने खरं तर निर्धारित वेळेत जिंकायला हवे, पण एक विरुद्ध एक चकमकीत कोलंबिया जिंकू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. बचावातील कामगिरी इंग्लंडचे यशापयश ठरवेल. त्यांनीच आक्रमकांवरील दडपण कमी करायला हवे. 
- स्वेन गोराक एरिकसन, इंग्लंडचे माजी मार्गदर्शक 

रेपिनो - बेल्जियमविरुद्धची लढत गमावून आपण विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग सोपा केला, असे इंग्लंड संघव्यवस्थापन समजत असले तरी कोलंबिया त्यांच्यासाठी खरं तर या स्पर्धेतील खरा पहिला ताकदवान प्रतिस्पर्धी आहे आणि तो इंग्लंडचा फुगवलेला फुगा फोडण्यास नक्कीच समर्थ असल्याचे मानले जात आहे. 

इंग्लंड कोलंबियास कमकुवत समजत आहे, पण इंग्लंडला एक तप बाद फेरीतील विजय साधलेला नाही, तो कोलंबियाने चार वर्षांपूर्वी मिळविला आहे. ट्युनिशिया आणि पनामावरील विजयाने इंग्लंडमध्ये अत्यानंद आहे, पण ते कधीही त्यांचा कस पाहणारे नव्हते. स्पर्धेतील खऱ्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंडने गट उपविजेतेपदास पसंती देण्याची चाल खेळली. 

जेम्स रॉद्रिगुएझ जखमी आहे, कोलंबियाचे अन्य खेळाडू प्रीमियर लीगमध्ये अपयशी ठरले आहेत, असे सांगून इंग्लंड आपला आत्मविश्‍वास उंचावत आहे; मात्र कोलंबियाचा कार्लोस सॅंचेझ हा हॅरी केनची सपोर्ट लाईन रोखू शकतो. 

इंग्लंडने खरं तर निर्धारित वेळेत जिंकायला हवे, पण एक विरुद्ध एक चकमकीत कोलंबिया जिंकू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. बचावातील कामगिरी इंग्लंडचे यशापयश ठरवेल. त्यांनीच आक्रमकांवरील दडपण कमी करायला हवे. 
- स्वेन गोराक एरिकसन, इंग्लंडचे माजी मार्गदर्शक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colombian speedbreaker on England Way?