हॅट्ट्रिकसह क्रोएशियाची मुसंडी पदार्पण करणाऱ्या आइसलॅंडचा प्रतिकार भेदला

वृत्तसंस्था
Thursday, 28 June 2018

पदार्पण करणाऱ्या आइसलॅंडचा प्रतिकार 2-1 असा भेदत अखेरच्या मिनिटाला क्रोएशियाने विश्‍वकरंडक स्पर्धेत हॅट्ट्रिकसह बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत उरुग्वेनंतर अशी कामगिरी केलेला क्रोएशिया दुसराच संघ ठरला. 90व्या मिनिटाला इव्हान पेरिसीच याने केलेला गोल निर्णायक ठरला. तिन्ही गोल दुसऱ्या सत्रात झाले. 

रोस्तोव - पदार्पण करणाऱ्या आइसलॅंडचा प्रतिकार 2-1 असा भेदत अखेरच्या मिनिटाला क्रोएशियाने विश्‍वकरंडक स्पर्धेत हॅट्ट्रिकसह बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत उरुग्वेनंतर अशी कामगिरी केलेला क्रोएशिया दुसराच संघ ठरला. 90व्या मिनिटाला इव्हान पेरिसीच याने केलेला गोल निर्णायक ठरला. तिन्ही गोल दुसऱ्या सत्रात झाले. 

मिलान बॅडेल्जने 53व्या मिनिटाला क्रोएशियाचे खाते उघडले होते. त्याने उसळत आलेल्या चेंडूवर पायाने ताबा मिळविला आणि गोल नोंदविला. स्पर्धेत प्रथमच मिळालेल्या संधीचा त्याने फायदा उठविला. मध्य फळीत ल्युका मॉड्रीचला त्याने दिलेली साथ बहुमोल ठरली. क्रोएशियाचा गोलरक्षक लॉव्रे कॅलिनीच याने चपळाईच्या जोरावर आइसलॅंडची चाल यशस्वी ठरू दिली नाही. त्यातच स्वेरीर इंगॅसन याने हेडिंग केलेला चेंडू बारला लागला. अखेर 14 मिनिटे बाकी असताना आईसलॅंडने पेनल्टीवर बरोबरी साधली. क्रोएशियाचा बदली खेळाडू डेजॅन लॉव्रेन याने चेंडू हाताने अडविला होता. त्यामुळे लाभलेली सुवर्णसंधी गिल्फी सिगुर्डसन याने सत्कारणी लावली. याबरोबरच त्याने नायजेरियाविरुद्ध झालेल्या चुकीची भरपाई केली. 

क्रोएशियाने सुरवात आक्रमक केली. मॉड्रीचने 19व्या मिनिटाला उल्लेखनीय प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर आइसलॅंडने उत्तम प्रयत्न केला. हॉरडूर मॅग्नुसन याने योहान गुडमुंडसन याच्या कॉर्नरवर हेडिंग केले, पण चेंडू बाहेर गेला. बॅडेल्जच्या ढिलाईमुळे चेंडूवर ताबा मिळवीत अल्फ्रेड फिनबोगॅसन याने मारलेला फटका स्वैर होता. कॅलिनीचकडून दुर्मीळ चूक झाल्यामुळे आईसलॅंडला कॉर्नर मिळाला. त्यावर बिरकीर बॅजार्नासन याने कॉर्नरवर प्रयत्न केला, पण कॅलिनीचने ऍरॉन गुन्नारसन याचा फटका छान अडविला. उत्तरार्धात क्रोएशियाने खेळातील समन्वय आणखी भक्कम केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Croatia wrap up Group D with Ivan Perisic winner but Iceland are out