डेन्मार्कची पेरूवर मात 

वृत्तसंस्था
Sunday, 17 June 2018

दुसरीकडे युसूफ पॉल्सेन याने या चुकीची भरपाई करीत गोल केला. त्यामुळे त्याचा चेहरा आनंदाने प्रफुल्लित झाला. "क' गटाच्या या सामन्यात पेनल्टीसंदर्भातील घडामोडी निर्णायक ठरल्या. क्‍युएवा याला पाडल्यामुळे पेरूला पेनल्टी देण्याचा निर्णयसुद्धा व्हीएआर तंत्रज्ञानाने झाला. 

मॉस्को : डेन्मार्कने पेरूवर 1-0 असा विजय मिळविला. सामन्याच्या मध्यास पेरूच्या ख्रिस्तीयन क्‍युएवा याने पेनल्टी दवडली. त्यामुळे नंतर त्याला अश्रू अनावर झाले.

दुसरीकडे युसूफ पॉल्सेन याने या चुकीची भरपाई करीत गोल केला. त्यामुळे त्याचा चेहरा आनंदाने प्रफुल्लित झाला. "क' गटाच्या या सामन्यात पेनल्टीसंदर्भातील घडामोडी निर्णायक ठरल्या. क्‍युएवा याला पाडल्यामुळे पेरूला पेनल्टी देण्याचा निर्णयसुद्धा व्हीएआर तंत्रज्ञानाने झाला. 

क गटातले पेरू आणि डेन्मार्क तसे तुलनेने कमजोर संघ होते. प्रदीर्घ कालावधीनंतर पेरू वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत; तर डेन्मार्कची ही चौथी स्पर्धा आहे. 

हे महत्त्वाचे 
- डेन्मार्कच्या ख्रिस्तियन एरिकसन याचे पात्रता स्पर्धेत 11 गोल, युरोपीय पात्रतेत तिसरा. 
- पेरू 1982 नंतर प्रथमच विश्‍वकरंडकास पात्र. 
- डेन्मार्क संघातील खेळाडूंची सरासरी उंची (185 सेंमी) सर्वाधिक, तर पेरू खेळाडूंची (178 सेंमी) सर्वात कमी. 
- गत स्पर्धेस डेन्मार्क पात्र ठरले नव्हते. 
- डेन्मार्कची ही चौथीच स्पर्धा, पण त्यात तीन वेळा बाद फेरीत. 
- प्रतिस्पर्धी मार्गदर्शकांप्रमाणेच फ्रान्सचेही या लढतीवर लक्ष. आपल्याला गटात सर्वाधिक आव्हान कोणाचे याचे उत्तर फ्रान्सला या लढतीतून मिळेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denmark beat Peru 1-0 in World Cup 2018 group match