बरोबरीसह डेन्मार्क, फ्रान्स बाद फेरीत

वृत्तसंस्था
Wednesday, 27 June 2018

मॉस्को, ता. 26 : विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या दिवसापासून सुरू असलेला गोलचा धडाका "क' गटाच्या तिसऱ्या फेरीत मात्र थंडावला. डेन्मार्क आणि फ्रान्स ही लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. या बरोबरीसह दोन्ही संघ बाद फेरीत दाखल झाले. फ्रान्स गटात अव्वल, तर डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर राहिले.

मॉस्को, ता. 26 : विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या दिवसापासून सुरू असलेला गोलचा धडाका "क' गटाच्या तिसऱ्या फेरीत मात्र थंडावला. डेन्मार्क आणि फ्रान्स ही लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. या बरोबरीसह दोन्ही संघ बाद फेरीत दाखल झाले. फ्रान्स गटात अव्वल, तर डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर राहिले.

यंदाच्या स्पर्धेतील ही पहिली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. दोन्ही संघांना बरोबरी आवश्‍यक असल्याने या सामन्यात दोन्ही संघांकडून फारसे प्रयत्नच झाले नाहीत. फ्रान्स यापूर्वीच बाद फेरीस पात्र ठरले होते. त्यांनी केवळ क्रोएशियाशी खेळायचे टाळत आपली हार होणार नाही हे पाहिले.

दुसरीकडे डेन्मार्कनेदेखील आपला पराभव होणार नाही याकडेच लक्ष दिले. त्याचवेळी सोची येथील दुसऱ्या सामन्यात पेरूने ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय मिळविल्याने त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर झाला. दुसऱ्या सामन्यावर अवलंबून राहिलेल्या निकालामुळे ठरवून खेळण्याची प्रथा मोडून काढण्यासाठी 1982 पासून "फिफा'ने अखेरचे सामने एकाच दिवशी खेळविण्याची प्रथा पाडली होती. मात्र, या वेळी ती अपवाद ठरली.

डेन्मार्कने खोलवर पास देण्याचे तंत्र अवलंबले. दुसरीकडे फ्रान्सने चेंडूवर अधिक ताबा राहील याकडे लक्ष दिले. फ्रान्सने हाच विचार करून संघात सहा बदल केले. यानंतरही प्रशिक्षक ग्रीएझमन याला संघात कायम ठेवले होते; पण तो आपली छाप पाडू शकला नाही. सामना सुरू झाल्यावर अर्ध्या तासाने फ्रान्सला एक संधी मिळाली; पण डेम्बेले याची किक गोलपोस्टच्या जवळून बाहेर गेली. देसचॅम्प्स यांनी उत्तरार्धात बेंजामिन मेंडी याला हर्नाडेझच्या जागी खेळवले. पण, त्याच्याही फटक्‍यात अचूकता नव्हती.

पेरूचा विजय
याच गटातील दुसऱ्या पेरू आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात फारसे स्वारस्य नव्हते. ऑस्ट्रेलियाला बाद फेरीची संधी होती. पण, ते विजयाला गवसणी घालू शकले नाहीत. पूर्वार्धात 18व्या मिनिटाला आंद्रे कॅरिल्लो आणि उत्तरार्धात 50व्या मिनिटाला गुएर्रेरो याने गोल करून पेरूचा पहिला विजय साकार केला.
या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले. पेरूला मात्र 1978नंतर विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिला विजय मिळविल्याचे समाधान लाभले. त्या वेळी त्यांनी इराणचा 4-1 असा पराभव केला होता.
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denmark vs France match tied