रेयाल माद्रिदच सिकंदर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 May 2018

माद्रिद - ‘जो जीता वही सिकंदर’ याचाच अनुभव रेयाल माद्रिद घेत आहे. चॅंपियन्स लीग स्पर्धेत गटात दुसरे आले, त्यानंतर बाद फेरीच्या एकाही लढतीत पूर्णपणे प्रभावी कामगिरी झाली नाही. त्यांना बायर्न म्युनिकविरुद्धच्या दोन्ही लढतींत चेंडूवरील वर्चस्वही नीट साधत नव्हते, तरीही रेयालने अंतिम फेरीत प्रवेश केला.

माद्रिद - ‘जो जीता वही सिकंदर’ याचाच अनुभव रेयाल माद्रिद घेत आहे. चॅंपियन्स लीग स्पर्धेत गटात दुसरे आले, त्यानंतर बाद फेरीच्या एकाही लढतीत पूर्णपणे प्रभावी कामगिरी झाली नाही. त्यांना बायर्न म्युनिकविरुद्धच्या दोन्ही लढतींत चेंडूवरील वर्चस्वही नीट साधत नव्हते, तरीही रेयालने अंतिम फेरीत प्रवेश केला.

घरच्या मैदानावर संधी दवडण्याची खेळाडूंत स्पर्धा झाल्याने बायर्न १-२ पराजित झाले होते. दुसऱ्या टप्प्यात बायर्न गोलरक्षक स्वेन उलरीच याने करीम बेनझेमा याला गोल बहालच केला. जेम्स रॉड्रिगुएझ याने गोल करीत बायर्नचे आव्हान राखले होते, पण कॉरेंता तॉलिसा आणि थॉमस म्युएल्लर रेयाल गोलरक्षकास चकवू शकले नाहीत. गेराथ बेलऐवजी बेनझेमाला पसंती देण्याचा निर्णय धाडसी होता. बेनझेमाने दोन गोल केल्यामुळेच रेयालने बाजी मारली. 

नशिबाची साथ मोलाची
उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटास टॉलिसाने गोलरक्षक उलरीचकडे बॅकपास दिला, त्या वेळी त्यात कसलाही धोका नव्हता. गोलरक्षक चेंडू हातात घेण्यासाठी वाकला, पण हे करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आले, तोपर्यंत चेंडू त्याच्या हाताखालून गेला होता. बेनझेमाने संधीचा फायदा घेत रेयालचा दुसरा गोल केला. अर्थात ६३ व्या मिनिटास बायर्नने बरोबरी साधली होती. रेयालचा मार्सिलोने हाताला चेंडू लागलाची कबुली दिली. रेफ्रींना हा फाऊल दिसला नाही, असे तो म्हणाला. अन्यथा बायर्नला पेनल्टी मिळाली असती आणि कदाचित निकाल बदलला असता.

रेयाल खरच यशस्वी
    सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
    झिनेदिन झिदान यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून रेयालचे चॅंपियन्समधील आव्हान कायम
    गोलरक्षक केलॉर नॅवास याने बायर्नचे आठ प्रयत्न फोल ठरवले
    सर्जिओ रामोसने पूर्वार्धात पाच प्रयत्न रोखले, बायर्नने एकंदरीत 
पाच प्रयत्न अपयशी ठरवले होते.
    रेयाल १६ व्यांदा अंतिम फेरीत
    सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळणारे झिदान तिसरे व्यवस्थापक, 
यापूर्वी मार्सेलो लिप्पी (१९६६ ते ६८).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: football competition