esakal | मॅंचेस्टरची आणखी एक बरोबरी
sakal

बोलून बातमी शोधा

मॅंचेस्टर - इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत एव्हर्टनच्या रॉस बर्कले याला चकवून मुसंडी मारताना मॅंचेस्टर युनायटेडचा इब्राहिमोविच.

मॅंचेस्टरची आणखी एक बरोबरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लंडन - बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या झाल्टन इब्राहिमोविचने भरपाई वेळेत पेनल्टीवर केलेल्या गोलामुळे मॅंचेस्टर युनायटेडचा पराभव टळला. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत त्यांनी एव्हर्टनविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली आणि पाचवे स्थान कायम ठेवले.

भरपाई वेळेतील अखेरच्या क्षणी एव्हर्टनच्या ऍशली विलियम्सने हाताने चेंडू अडवला, त्यामुळे मॅंचेस्टरला पेनल्टी मिळाली, या संधीचे इब्राहिमोविचने गोलात रूपांतर केले आणि संघाचा पराभव टाळला. जोस मौरिन्हो यांच्या मॅंचेस्टर युनायटेडने घरच्या मैदानावरचा नववा सामना अनिर्णित राखला; परंतु चौथ्या स्थानावर असलेल्या सिटीविरुद्धची चार गुणांची पिछाडी त्यांना कमी करता आली नाही.

मैदानावर झालेल्या खेळाचा विचार करता तो समाधानकारक नव्हता, परंतु खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नांचे समाधान आहे, असे मौरिन्हो म्हणाले. रविवारी घरच्याच मैदानावर झालेल्या वेस्ट ब्रोमविच संघाविरुद्धही मॅंचेस्टर युनायटेडला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
मॅंचेस्टर एकूण 20 सामन्यांत अपराजित राहिले आहे. पण, घरच्या मैदानावर अपेक्षेपेक्षा जास्तच सामने अनिर्णित राहिले आहेत. दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धही आम्हाला विजय मिळवता आला नाही. याचा फटका मोसम संपता संपता बसू शकेल, अशी भीती मौरिन्हो यांनी व्यक्त केली.
इब्राहिमोविचचा हा यंदाच्या मोसमातला 27 वा गोल होता. या बरोबरीमुळे 54 गुणांसह मॅंचेस्टर पाचव्या स्थानी असल्यामुळे चॅंपियन्स लीगच्या पात्रतेसाठी चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारणे त्यांना सोपे नाही, परिणामी पुढील मोसमातही त्यांना युरोपी लीगमध्येच खेळावे लागण्याची शक्‍यता आहे.

दुसऱ्या बाजूला मॅंचेस्टर सिटीने तळाच्या संदरलॅंडचा 2-0 असा पराभव केला आणि नवे प्रशिक्षक क्रेग शेक्‍सपिअर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग सहावा विजय मिळवला.

loading image