वादग्रस्त पेनल्टीवर रेयाल माद्रिद तरले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 April 2018

माद्रिद - भरपाई वेळेच्या ९७ व्या मिनिटाला मिळालेल्या वादग्रस्त पेनल्टी कॉर्नरवर ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदचा एकमवे गोल केला आणि याच गोलाच्या जोरावर युव्हेंट्‌सविरुद्धचा सामना १-३ असा गमावूनही गतविजेत्यांनी ४-३ अशा ॲग्रीगेटवर चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. युव्हेंट्‌समधून खेळणारा इटलीचा दिग्गज गोलरक्षक बफनच्या कारकिर्दीचा शेवट मात्र दुर्दैवी ठरला. त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले.

रेयाल विरुद्ध युव्हेंट्‌स यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा दुसऱ्या टप्प्याचा हा सामना अखेरच्या क्षणी कमालीचा तणापूर्व झाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यात रेयालने ३-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात युव्हेंट्‌ससमोर घरच्या मैदानावर मोठे आव्हान होते. कमालीचा खेळ करत त्यांनी तीन गोल करून ३-० आघाडी आणि ॲग्रीगेटमध्ये ४-४ अशी बरोबरी साधली. या सामन्यात सात मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला होता आणि त्याच्या अखेरच्या मिनिटाला रेयालला पेनल्टी कीक देण्यात आली; यामुळे युव्हेंट्‌सचा गोलरक्षक बफन कमालीचा चिडला. त्यामुळे त्याला रेडकार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले परिणामी राखीव गोलरक्षक मैदानात उतरला आणि त्याला चकवून रोनाल्डोने निर्णायक गोल केला.

आदल्या दिवशी जायंटकिलर ठरलेल्या रोमाने बार्सिलोनाचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यानंतर युव्हेंट्‌स रेयालला बाहेरचा रस्ता दाखवणार, अशी शक्‍यता निर्माण झालेली असताना अखेरच्या क्षणी देण्यात आलेल्या पेनल्टी कीकने महानाट्य घडले. गतस्पर्धेत रेयालने युव्हेंट्‌सलाच हरवून चॅंपियन्स विजेतेपद मिळवले होते.

दोन पिवळ्या कार्डमुळे सर्जिओ रामोस या सामन्यात खेळण्यापासून अपात्र ठरला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: football competition chrisronaldo ronaldo