esakal | कोचीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण न होण्याची संचालकांना अपेक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

कोचीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण न होण्याची संचालकांना अपेक्षा 

कोचीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण न होण्याची संचालकांना अपेक्षा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - विश्‍वकरंडक कुमार फुटबॉल स्पर्धा आता 292 दिवसांवर आली आहे. स्टेडियम तयार होत आहेत. स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. आता कोचीतही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जागतिक कुमार फुटबॉल स्पर्धेचे संचालक जेव्हिअर सेप्पी यांनी व्यक्त केली. 

आयएसएल स्पर्धेदरम्यान कोचीतील लढतीच्या वेळी चाहते स्टेडियममध्ये घुसले होते, स्पर्धा लढतीसाठी पहिले प्रमाणपत्र कोचीला दिल्यामुळे संयोजन समितीचे पदाधिकारी नाराज झाले होते. या संदर्भात सेप्पी म्हणाले, की सुरक्षेची जबाबदारी ही स्थानिक राज्य सरकारचीच असेल. खासगी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक असले, तरी अंतिम जबाबदारी प्रशासनाचीच असते. सुरक्षित संयोजनाचे आश्वासन देण्यात आले आहे. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करीत आहोत. त्यांची सुरक्षेची योजना तयार आहे. आमच्यासमोर याबाबत कोणताही आर्थिक प्रश्न नाही. या योजना प्रत्यक्षात येतील, याकडे आम्हीही लक्ष देणार आहोत. 

स्पर्धेच्या स्टेडियममध्ये संयोजनासाठी आवश्‍यक असलेले बदल आयएसएल लढतींमुळे थांबले होते. आता ते स्पर्धेच्या दृष्टीने तयार होण्यास सुरवात होईल. काम अपेक्षेनुसार होण्यास सुरवात झाली आहे, असे भारतात म्हटले जाते. तेच घडत आहे. आता स्पर्धा दहा महिन्यांवर आली आहे. भारतातील पहिली कंपनी स्पर्धेशी नाते जोडत आहे. भारतात प्रथमच विश्‍वकरंडक होत आहे. भारत प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहे. यांसारख्या अनेक गोष्टी प्रथमच घडत असल्याचे सेप्पी यांनी सांगितले. 

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम कायम स्पर्धेच्या संयोजनासाठी पूर्ण मदत करण्यास तयार आहेत. डॉ. विजय पाटील आमचे महत्त्वाचे सहकारी आहेत. ते खूप काही करण्यास तयार आहेत. स्टेडियमच्या निमित्ताने बकेट सीटस्‌ वसवल्या जातील. ड्रेसिंग रूम तयार होत आहे. नवी मुंबई क्रीडा संघटनेच्या सुविधा चांगल्या दर्जाच्या होत आहेत.