आघाडीच्या संघांची सलामीला पीछेहाट

वृत्तसंस्था
Tuesday, 19 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरवातीपासून रंगतदार करण्यात स्पर्धेतील सलामीची फेरी मोलाची ठरली आहे. जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या बारापैकी केवळ फ्रान्सनेच विजय मिळविला आहे. 
 

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरवातीपासून रंगतदार करण्यात स्पर्धेतील सलामीची फेरी मोलाची ठरली आहे. जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या बारापैकी केवळ फ्रान्सनेच विजय मिळविला आहे. 

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले जर्मनी मेक्‍सिकोविरुद्ध पराजित झाले, तर स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या ब्राझीलला बरोबरी पत्करावी लागली. चौथ्या क्रमांकावरील पोर्तुगाल आणि पाचव्या क्रमांकावरील अर्जेंटिनावरही हीच वेळ आली.

संयुक्त बारावे असलेल्या डेन्मार्कने त्यांच्यापेक्षा एक मानांकन सरस असलेल्या पेरूला हरवले. तिसरे मानांकित बेल्जियम, आठवे मानांकित पोलंड आणि संयुक्त बारावे मानांकित इंग्लंडच्या लढती झालेल्या नाहीत, तर नववे मानांकित चिली स्पर्धेसच पात्र ठरले नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The front team in football 2018 going backfoot