स्वीडनचा सुदैवी विजय 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 July 2018

सेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते. 

सेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते. 

चेंडूवरील वर्चस्व विजय देत नाही याचा अनुभव स्वित्झर्लंडला आला. स्विसच्या आक्रमणात भेदकता नव्हती, त्यांचे गोलपोस्टच्या दिशेने चार शॉट्‌स होते; पण त्यापैकी एकावरही गोल होईल असे वाटले नाही. स्वीडननेही क्वचितच आक्रमण केले. या परिस्थितीत फोर्सबर्ग याचा लकी गोल निर्णायक ठरला नसता तरच नवल. त्याचा शॉट मॅन्यूएल ऍकानजी याच्या बुटाला लागून गोलजाळ्यात गेला, त्यामुळे स्विस गोलरक्षकही चकला. 

खरेतर प्रतिस्पर्ध्यांनी प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला होता. सामन्याच्या सुरवातीस बचावात्मक खेळ केल्यामुळे चाहते संतप्त झाले. त्यांनी आपल्याच संघांची हुर्यो उडवली. त्यानंतर प्रतिस्पर्धी काहीसे आक्रमक झाले आणि त्यात स्वीडन काहीसेच वरचढ होते. प्रतिस्पर्ध्यांची नेमबाजी सदोष होती, तसेच बचावावरच भर असल्याने गोलक्षेत्रात बचावपटूंची जास्त गर्दीही होती. 

उत्तरार्धाची सुरवात वेगळी नव्हती. चेंडू प्रामुख्याने मैदानाच्या मध्यभागीच होता. त्या वेळी पेनल्टी शूटआउटवरच निर्णय होणार असे वाटत होते; पण अखेरीस फोर्सबर्गच्या गोलने स्वीडनला आघाडीवर नेले. या गोलनंतर स्वित्झर्लंडने वेगवान प्रतिआक्रमणे केली. भरपाई वेळेत तर स्वीडनचा बचाव कोलमडणार असेच वाटत होते; पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना पेनल्टी किक देण्याचा निर्णय रेफरींनी वारच्या मदतीने फिरवला, पण सामन्याचा निकाल बदलला नाही. 

- स्वीडनचा 1958 नंतर प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग दोन लढतींत विजय, त्या वेळी उपांत्यपूर्व, तसेच उपांत्य लढतीत सरशी 
- स्वीडन 1994 नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत 
- एमिल फोर्सबर्ग याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल विश्वकरंडक स्पर्धेत 
- स्वीडनचे विश्वकरंडकातील गेल्या नऊपैकी आठ गोल उत्तरार्धात 
- विश्रांतीस बरोबरी आणि विजय हे समीकरण स्वीडनबाबत विश्वकरंडकात सलग तिसऱ्यांदा, त्याचवेळी विश्रांतीच्या बरोबरीनंतर सामना न जिंकल्याची वेळ स्वित्झर्लंडवर सलग तिसऱ्यांदा 
- स्वित्झर्लंडचा विश्वकरंडक स्पर्धेच्या बाद फेरीत 64 वर्षांत एकही गोल नाही 
- स्वित्झर्लंडने सलग सातवी बाद फेरीतील लढत गमावली 

अशी झाली लढत 
स्वीडन-स्वित्झर्लंड 

1 गोल 0 
12 शॉट्‌स 18 
3 ऑन टार्गेट 4 
3 कॉर्नर्स 11 
1 ऑफसाइड 0 
37 % चेंडूवर वर्चस्व 63 % 
198 यशस्वी पास 501 
105 एकूण धाव, किमी 103 
1 यलो कार्डस 2 
0 रेड कार्डस 1 
11 फाउल्स 13 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good luck in Sweden