esakal | स्पेनच्या आंद्रेस इनिएस्ताचा फुटबॉलला अलविदा
sakal

बोलून बातमी शोधा

Iniesta retires from international football

स्पेनच्या पाठिराख्यांना रविवारी एकाच दिवसात दोन धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लागला. रशियाने स्पेनला फुटबॉल विश्वकरंडकाच्या बाद फेरीतच गारद केल्याचे दुःख ताजे असतानाच स्पेनचा जेष्ठ खेळाडू आंद्रे इनिएस्ताने फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.

स्पेनच्या आंद्रेस इनिएस्ताचा फुटबॉलला अलविदा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रशिया : स्पेनच्या पाठिराख्यांना रविवारी एकाच दिवसात दोन धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लागला. रशियाने स्पेनला फुटबॉल विश्वकरंडकाच्या बाद फेरीतच गारद केल्याचे दुःख ताजे असतानाच स्पेनचा जेष्ठ खेळाडू आंद्रेस इनिएस्ताने फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. स्पेनची संभाव्य विजत्यांमध्ये गणना केली जात होती. मात्र रशियाने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव केला.

इनिएस्ताने फुटबॉल विश्वकरंडक सुरु होण्याआधीच हा माझा शेवटचा विश्वकरंडक आहे असे सांगून निवृत्तीची घोषणा केली होती. ''हा माझा स्पेनच्या संघासोबत शेवटचा सामना होता. शेवट नेहमी आपल्याला हवा तसाच होतो असे नाही. आजचा दिवस मला प्रचंड दुःख देणारा आहे. हा एका सुंदर प्रवासाचा अंत आहे.'' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

स्पेनच्या संघाने त्याचे आभार मानत ट्विट केले, ''आम्ही फक्त तुझे आभार मानू शकतो इनिएस्ता. तु आम्हाला यशाचा शिखरावर पोहचवून आमचा गौरव केला आहेस. तु मैत्रीचे एक उत्तम उदाहरण आहेस. अद्वितीय, तुझ्यासारखा खेळाडू पुन्हा होणे नाही. धन्यवाद इनिएस्ता.''