जपान-सेनेगलची रंगतदार बरोबरी

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

येकेतेरेनबुर्ग, ता. 24 : जपानने आशियाची ताकद दाखवून देताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सेनेगलविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सोळा वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत फ्रान्सला हरवलेल्या सेनेगलने या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती; पण त्यांना जपानने 2-2 रोखत जमिनीवर आणले.

जपान, तसेच सेनेगल संघात फारसा फरक नव्हता. दोघांचाही बचाव कमकुवत होता. त्याचवेळी आक्रमणात ते तोडीस तोड होते. हेच सामन्याच्या निकालातही दिसले. चेंडूवरील वर्चस्वात जपान सरस होते, तर शॉटस्‌मध्ये सेनेगल. जपानने पहिला गोल सेनेगलला भेट दिला. त्यामुळेच त्यांचा विजय दुरावला.

पूर्वार्धाच्या तुलनेत जपानचा खेळ बहरला, तर सेनेगलचा खेळ उत्तरार्धात काहीसा खालावला. अर्थात, या बरोबरीमुळे "ह' गटातील कोंडीही कायम राहिली. अव्वल क्रमांकावरील जपान आणि दुसरे असलेले सेनेगल यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. त्यांची गोलसरासरीही समान आहे.

जपानकडून इनुई ताकाहाशी (34वे मिनिट) आणि केईसुके होंडा (78वे मिनिट) यांनी, तर सेनेगलकडून सादिओ मॅने (11वे मिनिट) आणि मौसा वागुए (71वे मिनिट) यांनी गोल केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan Senegal tie