esakal | रेआल माद्रिदचा विजय; मात्र बार्सिलोनाची हार
sakal

बोलून बातमी शोधा

माद्रिद - ला लिगा फुटबॉल स्पर्धेत रेआल बेटिसविरुद्ध निर्णायक क्षणी गोल केल्यावर आनंद व्यक्त करताना रेआल माद्रिद संघाचा सर्गिओ रामोस.

रेआल माद्रिदचा विजय; मात्र बार्सिलोनाची हार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस - अखेरच्या क्षणी गोल करून संघाला विजय मिळवून देण्यात सेर्जीओ रामोस पुन्हा एकदा यशस्वी ठरला. त्याच्या निर्णायक गोलमुळे रेआल माद्रिद संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत रेआल बॅटिसचा पराभव केला. अन्य एका सामन्यात चॅंपियन्स लीग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या बार्सिलोनाला डिपोर्टिवो संघाकडून पराभव पत्करावा लागला.

ला लिगा स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांनंतर रेआलचे 26 सामन्यांनंतर 62 गुण झाले; तर 27 सामन्यानंतर बार्सिलोनाला 60 गुणांवरच थांबावे लागले. सुपरस्टार रोनाल्डो संघात असला, तरी रेआल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांच्यासाठी रामोस हुकमी खेळाडू ठरत आहे. गेल्या काही सामन्यांत त्यांचा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत आला आहे, तेव्हा तेव्हा रामोसने अखेरच्या क्षणी गोल करून संघाला विजय मिळवून दिला आहे.

रेआलने आघाडी मिळवताना रेआल बॅटिसचा 2-1 असा पराभव केला. हे दोन्ही गोल त्यांनी पिछाडीवरून केले. सॅनबेरियाने 24 व्या मिनिटाला बॅटिसचे खाते उघडले. त्यानंतर रोनाल्डोने रेआल माद्रिदला 41 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरला गोलफलक 1-1 असा होता. बॅटिसच्या पेकीनीने 78 व्या मिनिटाला गोल केला; परंतु त्यानंतर लाल कार्ड मिळाल्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या बॅटिसवर निर्णायक गोल रामोसने 81 व्या मिनिटाला नोंदवला.

बार्सिलोनाचा पराभव
चॅंपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व साखळी सामन्यात पीएसजीवर 6-1 असा ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या बार्सिलोनाला तो जोश ला लीगा स्पर्धेत 15 व्या स्थानी असलेल्या डिपोर्टिवो संघाविरुद्ध दाखवता आला नाही. या सामन्यात त्यांना 1-2 असा पराभवास सामारो जावे लागले. ड्रिपोटिवोने 2008 नंतर प्रथमच बार्सिलोनाला पराभवाचा धक्का दिला. चॅंपियन्स लीग स्पर्धेत त्या ऐतिहासिक सामन्यात दोन गोल करणाऱ्या नेमारची उणीव बार्सिलोनाला भोवली. या सामन्यांसाठी बार्सिलोनाने नेमारसह पाच बदल केले होते. मेस्सीलाही आपली जादू दाखवता आली नाही. डिपोर्टिवोकडून जोसेलू आणि गार्सिसा यांनी गोल केले. बार्सिलोनाचा एकमात्र गोल लुईस सुआरेझने केला.

loading image