चॅड्लीचा गोल अन् बेल्जियमचा पिछाडीवरून विजय (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
मंगळवार, 3 जुलै 2018

बेल्जियमच्या खेळाडूंनी आपल्या खेळाने जगाला दाखवून दिले की आपल्याला गोल्डन जनरेशन का म्हटले जाते. दोन गोलच्या पिछाडीवर असतानाही त्यांनी जबरदस्त खेळ करत शेवटच्या 25 व्या मिनिटांमध्ये तीन गोल करत विजय मिळविला. विश्वकरंडकाच्या बाद फेरीच्या इतिहासात 90 मिनिटांमध्ये 2 किंवा जास्त गोलच्या पिछाडीवर असताना विजय मिळविण्याची कामगिरी दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी 1966 च्या विश्वकरंडकात उपउपांत्य फेरीत पोर्तुगालने डीपीआर कोरियाचा 3-0 च्या पिछाडीवरून 5-3 ने विजय नोंदविला होता.

नासेर चॅड्ली याने अंतिम काही सेकंदात मारलेल्या गोलमुळे बेल्जियमने जपानवर नाट्यमयरित्या पिछाडीवर असतानाही विजय मिळविला. 

बेल्जियमला या सामन्यात विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात होते. सामन्याला सुरवात झाल्यानंतर जपानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत बेल्जियमला सामन्यात वर्चस्व मिळवू दिले नाही. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफच्या सुरवातीलाच पाच मिनिटांमध्ये जपानच्या खेळाडूंनी दोन करून बेल्जियमला जबरदस्त धक्का दिला. जपानसाठी पहिला गोल गेन्की हारागुची याने 48 व्या मिनिटाला आणि दुसरा गोल ताकाशी इनुई याने 52 व्या मिनिटाला गोल करत जपानला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दोन गोलच्या पिछाडीवर असलेला बेल्जियम पुढे कसा खेळ करणार याबाबत उत्सुकता होती. बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ यांनी संघात दोन बदल करत बेल्जियमला पुन्हा सामन्यात परत आणण्यास सुरवात केली. त्यांनी नासेर चॅड्ली आणि मारौयानी फेलायनी या दोन खेळाडूंना मैदानात उतरविले. यामुळे बेल्जियमच्या खेळाडूंनी आपल्या पद्धतीत बदल केला आणि याचा फायदा बेल्जियमला झाला. 69 व्या मिनिटाला बेल्जियमच्या जेन व्हेर्टोंगेन याने हेडरद्वारे गोल करत बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदविला. त्यानंतर पाचव्याच मिनिटाला फेलायनी याने कर्णधार हॅजार्डच्या पासवर गोल करत बेल्जियमला बरोबरी साधून दिली. सामना बरोबरीत सुटेल आणि सामना अतिरिक्त वेळेत जाईल असे वाटत असतानाच शेवटच्या काऊंटर अॅटॅकवर चॅड्लीने 90 (+4) मिनिटाला गोल करत बेल्जियमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. जपानचा या पराभवामुळे स्वप्नभंग झाला.

बेल्जियमच्या खेळाडूंनी आपल्या खेळाने जगाला दाखवून दिले की आपल्याला गोल्डन जनरेशन का म्हटले जाते. दोन गोलच्या पिछाडीवर असतानाही त्यांनी जबरदस्त खेळ करत शेवटच्या 25 व्या मिनिटांमध्ये तीन गोल करत विजय मिळविला.

विश्वकरंडकाच्या बाद फेरीच्या इतिहासात 90 मिनिटांमध्ये 2 किंवा जास्त गोलच्या पिछाडीवर असताना विजय मिळविण्याची कामगिरी दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी 1966 च्या विश्वकरंडकात उपउपांत्य फेरीत पोर्तुगालने डीपीआर कोरियाचा 3-0 च्या पिछाडीवरून 5-3 ने विजय नोंदविला होता.

सोमवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये ब्राझीलने मेक्सिकोचा 2-0 ने सहज पराभव केला. आता उपउपांत्य फेरीत ब्राझील आणि बेल्जियम यांच्यात लढत होणार आहे. बेल्जियमचा संघ प्रथमच सलग दुसऱ्यांदा विश्वकरंडकाच्या उपउपांत्य फेरीत खेळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Belgium Japan match