रोनाल्डो एके रोनाल्डो (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Saturday, 16 June 2018

रोनाल्डोने या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदविली. त्याने देश आणि क्लबकडून खेळताना नोंदविलेली ही 51 वी हॅट्ट्रिक होती. विश्वकरंडकाच्या इतिहासातील ही 51 वी हॅट्ट्रिक होती. रोनाल्डो हा विश्वकरंडक फुटबॉल इतिहासातील चौथा खेळाडू ठरला आहे. ज्याने सलग चार विश्वकरंडक स्पर्धांमध्ये गोल केला. 2006, 2010, 2014 आणि आता 2018 च्या विश्वकरंडकात त्याने गोल केला आहे. वयाच्या 33 वर्षी विश्वकरंडक खेळत असलेला रोनाल्डो हॅट्ट्रिक करणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठऱला आहे. 

पोर्तुगाल आणि स्पेन या बलाढ्य संघांमधील सामना हा यंदाच्या विश्वकरंडकातील रोमांचक सामना होईल, अशी फुटबॉलप्रेमींची अपेक्षा होती. ग्रुप स्टेजमधील या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. सामना झालीही तसाच. यंदाच्या विश्वकरंडकाला ज्या सामन्याची गरज होती अगदी तसाच सामना झाला. दोन्ही संघातील खेळाडू जागतिक प्रसिद्ध फुटबॉल क्लबमध्ये खेळत असल्याने त्यांच्याकडून दर्जेदार खेळ पहायला मिळेल अशी अपेक्षा होती आणि खेळ झालाही तसाच. 

ग्रुपमधील सामन्याची सुरवात जोरदार झाली. सामन्याचा पाचव्याच मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल करत पोर्तुगालचे खाते उघडले. रेआल मद्रिद क्लबमध्ये रोनाल्डोबरोबर खेळणाऱ्या नॅचो फर्नांडीस याने डी मध्ये पाडले आणि पेनल्टी मिळाली त्याचे गोलमध्ये रुपांतर केले. स्पेनने डिआगो कोस्टाच्या गोलमुळे बरोबरी केली. कोस्टाच्या या गोलसाठी यंदाच्या विश्वकरंडकात पहिल्यांदाच व्हिडिओ असिस्टंट रेफ्री (व्हीएआर) ही पद्धत वापरण्यात आली आणि हा गोल आहे की नाही हे स्पष्ट करण्यात आले. पहिल्या हाफमध्ये रोनाल्डोने दुसरा गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. स्पेनचा गोलकिपर डेव्हिड डीगिया याला योग्यरित्या न हाताळल्याने स्पेनला पिछाडीवर रहावे लागले. 

दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने जोरदार खेळ करत त्यांचा यंदाच्या विश्वकरंडकाचे दावेदार का म्हणतात हे दाखवून दिले. स्पेनने टिकीटाका फुटबॉल खेळाचे प्रदर्शन केले. याच खेळावर जोर देत स्पेनने बरोबरी केली. डिआगो कोस्टाने फ्रिकीकवर गोल करत स्पेनला बरोबरी साधून दिली. स्पेनच्या नॅचो फर्नांडिसने पोर्तुगालला दिलेल्या पेनल्टीची भरपाई करत स्पेनसाठी तिसरा गोल केला. बंदुकीतून बुलेट सुटते त्याप्रमाणे फर्नांडिसने किक मारत गोल केला. मात्र, अखेर रोनाल्डोच हिरो ठरला. जेरार्ड पिकेने डीच्या बाहेर पाडले. त्यावर पोर्तुगालला फ्रिकीक मिळाली. फ्रिकीकसाठी प्रसिद्ध असलेल्या रोनाल्डोने फ्रिकीक घेतली आणि पोर्तुगालला बरोबरी साधून दिली आणि त्याने आपणच फ्रिकीकवर गोल करणारा सर्वोत्तम खेळाडू असल्याचे दाखवून दिले. अनुभवी पिकेकडून अशी चूक झाल्याने स्पेनला विजयापासून दूर रहावे लागले. 

रोनाल्डोने या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदविली. त्याने देश आणि क्लबकडून खेळताना नोंदविलेली ही 51 वी हॅट्ट्रिक होती. विश्वकरंडकाच्या इतिहासातील ही 51 वी हॅट्ट्रिक होती. रोनाल्डो हा विश्वकरंडक फुटबॉल इतिहासातील चौथा खेळाडू ठरला आहे. ज्याने सलग चार विश्वकरंडक स्पर्धांमध्ये गोल केला. 2006, 2010, 2014 आणि आता 2018 च्या विश्वकरंडकात त्याने गोल केला आहे. वयाच्या 33 वर्षी विश्वकरंडक खेळत असलेला रोनाल्डो हॅट्ट्रिक करणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठऱला आहे. 

या सामन्यामध्ये स्पेनचा खेळ प्रभावित होता आणि सामन्यावर त्यांचे वर्चस्व होते. पण, रोनाल्डोने दाखवून दिले की जगातील तो सर्वोत्तम खेळाडू का आहे हे त्याने दाखवून दिले. स्पेनच्या प्रशिक्षकांची नुकतीच हकालपट्टी करण्यात आली होती आणि नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती झाली असतानाही अनुभवी खेळाडूंच्या जीवावर स्पेनच्या खेळाडूंनी उत्तम खेळ केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Spain Portugal Match