अर्जेंटिनाचा विजय अन् मॅराडोना रुग्णालयात

वृत्तसंस्था
Wednesday, 27 June 2018

सेंट पिटर्सबर्ग : फुटबॉल विश्वकरंडकातून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अर्जेंटिनाने अखेर नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश मिळवला. अर्जेंटिनाची बाद फेरी गाठण्याची शेवटीची संधी असलेला हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती तसेच अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनीही सामन्याला उपस्थिती लावली.

नायजेरियाविरुद्ध झालेल्या नाट्यमय विजय साजरा करणे मॅराडोनाला चांगलेच महागात पडले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. 57 वर्षीय मॅराडोना अर्जेंटिनाच्या विजयानंतर अतिउत्साहात कोसळल्यामुळे त्यांना रुग्णालयात न्यावे लागले. सामन्याचा निकाल स्पष्ट झाल्यावर त्यांनी आक्षेपार्ह हातवारे करत प्रचंड जोशात विजय साजरा केला. त्यानंतर मात्र त्यांना चालणेही अवघड झाले. पूर्वी अमली पदार्थांचे व्यसन असलेले आणि भावनांवर नियंत्रण नसलेले मॅराडोना याआधीच्या सामन्यातही सिगारेट ओढत असल्याचे निर्दशनास आले होते. 

सेंट पिटर्सबर्ग मैदानातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या मॅराडोना यांची नाडी तपासली आणि त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रक्त दाब वाढल्यामुळे मॅराडोना कोसळल्याचे प्राथमिक तपासात निर्दशनास आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maradona admitted into hospital after Argentina's win