अर्जेंटिनाची काळजी मॅराडोनापासून शाहरुखपर्यंत...

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

अर्जेंटिनाची बाद फेरी गाठण्याची शेवटीची संधी असलेला अर्जेंटिना विरुद्ध नायजेरिया यांच्यातील  सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांसह अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनीही सामन्याला उपस्थिती लावली. तर इथे भारतातही अर्जेंटिना बाद फेरी गाठते की नाही या काळजीने अनेक जण चिंताग्रस्त होते.

जगभरात मेस्सीचे अनेक चाहते आहेत आणि याला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानही अपवाद नाही. ''या मॅरोडानामुळे काळजीत प्रचंड भर पडते. नायजेरियाच्या संघाला खूप शुभेच्छा पण अर्जेंटिना बाद फेरीत असायलाच हवी'' असे ट्विट त्याने केले आहे. बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग हादेखील अर्जेंटिनाचा मोठा चाहता आहे. अर्जेंटिनाला जिंकण्यासाठी फक्त थोड्या चमत्काराची गरज होती असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

57 वर्षीय मॅराडोना अर्जेंटिनाचा विजय अतिउत्साहात साजरा करताना कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात न्यावे लागले. सामन्याचा निकाल स्पष्ट झाल्यावर त्यांनी आक्षेपार्ह हातवारे करत प्रचंड जोशात विजय साजरा केला. त्यानंतर मात्र त्यांना चालणेही अवघड झाले.

Web Title: Maradona and Shah Rukh Khan worried about Argentina