दक्षिण अमेरिकन संघांसाठी आव्हानात्मक दिवस

वृत्तसंस्था
Friday, 6 July 2018

उपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा सामने येतात तेव्हा त्यांचे महत्त्व सहाजिकच वाढलेले असते. माझ्या शेजारील देशांचे संघ या सामन्यासाठी एक किंवा दोन खेळाडूंना मुकतील असेच वाटत आहे. 
 

उपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा सामने येतात तेव्हा त्यांचे महत्त्व सहाजिकच वाढलेले असते. माझ्या शेजारील देशांचे संघ या सामन्यासाठी एक किंवा दोन खेळाडूंना मुकतील असेच वाटत आहे. 

टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅसेमिरो हा ब्राझीलच्या बचावाचा कणा ठरला आहे. बचावाच्या आघाडीवर त्याने मोठी भूमिका बजावली आहे. चारही सामन्यांत तो प्रतिस्पर्ध्यांसमोर भक्कमपणे उभा होता. मात्र, दोन येलो कार्ड असल्यामुळे एका दर्जेदार युरोपियन संघाविरुद्ध खेळताना ब्राझीलला त्याची उणीव जाणवेल. उरुग्वेसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा प्रमुख स्टार एडिसन कव्हानी दुखापतीतून अजून पूर्ण बरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना या प्रमुख खेळाडूशिवाय उतरावे लागेल. 

ब्राझील संघ अधिक चांगला 
चार वर्षांपूर्वीपेक्षा ब्राझीलचा या वेळीचा संघ अधिक चांगला दिसून येत आहे. आक्रमण ही त्यांची खरी ताकद असताना नेमार आणि कुटिन्हो ही जबाबदारी चोख पार पाडत आहेत. विलियनने देखील अपेक्षा उंचावल्या आहेत. टिटे 4-2-3-1 या पद्धतीने खेळणार यात शंका नाही. या चारही आघाड्यांवर त्यांच्याकडे सर्वोत्तम खेळाडू आहे. आता बघायचे इतकेच की बचावफळीतील प्रमुख खेळाडूशिवाय ते या आघाडीवर कसे टिकून राहतात. 

सलग चार विजयानंतर बेल्जियम संघ अधिक भक्कम वाटत आहे. जपानवर पिछाडीवरून मिळविलेला विजय त्यांच्या क्षमतेची चुणूक दाखवून देतो. हजार्ड, केविन डी ब्रुईन हे दोन भक्कम बचावपटू, रोमेलू लुकाकूसारखा अव्वल स्ट्रायकर असे खेळाडू बेल्जियमची ताकद वाढवतात. प्रशिक्षक मार्टिनेझ यांची 3-4-2-1 ही रणनिती नक्कीच ब्राझीलच्या कौशल्याची कसोटी पाहील यात शंका नाही. प्रतिस्पर्धी संघावर दडपण ठेवून खेळणे यासाठीच बेल्जियम संघ उत्सुक असेल. 

दोन भक्कम संघ 
स्टार खेळाडूंच्या संघांचे आव्हान संपुष्टात आणून फ्रान्स आणि उरुग्वे संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. दोन भक्कम संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे एक जबरदस्त लढत बघायला मिळेल यात शंका नाही. फ्रान्सने मेस्सीच्या अर्जेंटिना, उरुग्वेने ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आणले आहे. वैयक्तिक गुणवत्तेवर अवलंबून असलेल्या या दोन्ही संघाविरुद्ध या संघांनी परिपूर्ण सांघिक खेळ केला. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे ताकदवान आक्रमणामुळे फ्रान्सची बाजू भक्कम राहील. त्याचवेळी उरुग्वे संघ प्रतिस्पर्ध्यांना खेळविण्यात वाकबगार नाही, पण दोन स्ट्रायकर्ससह खेळताना ते त्यांच्यावर दडपण ठेवून असतात. 

फ्रान्सची खरी ताकद ही त्यांच्या मध्यरक्षकांमध्ये आहे. फ्रान्सने उद्या विजय मिळविल्यास उद्या या मध्यरक्षकांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे. अर्जेंटिनाविरुद्ध एम्बाप्पेचा झालेला उदय फ्रान्ससाठी तारक ठरायला हरकत नाही. मैदानावर जागा निर्माण करून आपल्या कमाल वेगाचा फायदा करून घेण्यासाठी त्याला मैदानात पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. याचा परिणाम अर्जेंटिनाविरुद्ध दिसून आला. उरुग्वेविरुद्ध तो त्याच भन्नाट वेगाने खेळेलच असे नाही, कारण उरुग्वे खेळाडू त्याचा पाठलाग केल्याशिवाय राहणार नाहीत. सगळ्या गोष्टी विचारत घेतल्यानंतर फ्रान्सला संधी आहे. पण, उरुग्वे विजयासाठी अखेरपर्यंत झुंजतील यात शंका नाही आणि हेच फ्रान्ससाठी कठिण असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maradona Column about football match