फुटबाॅल : गोवा आणि जमशेदपूर यांच्यात आज निर्णायक लढत 

वृत्तसंस्था
Sunday, 4 March 2018

जमशेदपूर : इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात रविवारी एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी यांच्यात निर्णायक सामना होईल. बाद फेरीसाठी गोव्याला बरोबरी पुरेशी असेल, तर पदार्पण करणाऱ्या जमशेदपूरला निर्णायक विजयाची गरज असेल. 

जमशेदपूर : इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात रविवारी एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी यांच्यात निर्णायक सामना होईल. बाद फेरीसाठी गोव्याला बरोबरी पुरेशी असेल, तर पदार्पण करणाऱ्या जमशेदपूरला निर्णायक विजयाची गरज असेल. 

सध्या गोवा एका गुणाने पुढे आहे. चौथ्या स्थानावरील गोव्याचे 27, तर पाचव्या क्रमांकावरील जमशेदपूरचे 26 गुण आहेत. जमशेदपूरचे मुख्य प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, काहीशा विचित्र परिस्थितीतही मी समाधानी आहे. याचे कारण आम्हाला विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आम्हाला बरोबरी पुरेशी ठरणार असती तर मानवी स्वभावानुसार आहे ते राखून ठेवण्यास प्राधान्य दिले गेले असते. हे आमच्या कार्यपद्धतीत बसणारे नाही. मागील काही निकालांमुळे आमच्यासमोर एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे विजयाचे. आम्ही केवळ एकाच मार्गाने खेळ करू शकतो. बाद फेरीसाठी आम्हाला विजय अनिवार्य आहे. 

इंग्लंडच्या कॉप्पेल यांनी संघ जिंकण्यासाठीच खेळेल अशी ठाम ग्वाही दिली. पहिल्या लढतीत गोव्याची 2-1 अशी सरशी झाली होती. 

कॉप्पेल पुढे म्हणाले की, आम्हाला नेटसमोरील खेळात सुधारणा करावी लागेल का, असे विचारले तर स्वाभाविकच संपूर्ण मोसमात तशी स्थिती होती. नेटसमोर जास्त क्षमतेने भेदक खेळाची गरज असते. यात स्ट्रायकरचा दोष नसतो, तर संधी निर्माण करणे आणि गोल नोंदविणे ही संघाची जबाबदारी असते. रविवारी आम्हाला यात सुधारणा करावी लागेल. 

दुसरीकडे गोव्याला सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांनी नऊ गोलांचा पाऊस पाडला आहे. त्यांनी घरच्या मैदानावर एफसी पुणे सिटीविरुद्ध 4-0, तर गतविजेत्या एटीकेविरुद्ध 5-1 असा धडाका लावला. 2014 मध्ये लीगला प्रारंभ झाल्यापासून एटीकेला गोव्याने प्रथमच हरविले. 

गोव्याचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सांगितले की, आम्हाला बरोबरीसुद्धा पुरेशी असल्याची कल्पना आहे, पण आम्ही बरोबरीसाठी खेळलो तर पराभूत होऊ. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम खेळ करून जिंकण्यासाठीच प्रयत्न करू. 

गोवा जिंकल्यास गुणतक्‍त्यात दुसरे येतील, कारण पुण्याविरुद्ध त्यांची कामगिरी सरस आहे. गोव्याचे काही खेळाडू जायबंदी आहेत, पण त्याविषयी लॉबेरा यांनी तपशील दिला नाही. 

लॉबेरा म्हणाले की, जमशेदपूरचा संघ बचावाच्या बाबतीत सुसंघटित आहे. ते खेळाच्या शैलीविषयी आश्वासक आहेत. बाद फेरीसाठी झुंजण्याच्या योग्यतेचा खेळ त्यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news football news Indian Super League