रोनाल्डोची जन्मभूमी-कर्मभूमी वर्ल्डकपसाठी एकाच गटात 

वृत्तसंस्था
शनिवार, 2 डिसेंबर 2017

मॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसमोरील पेच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉने बिकट केला आहे. रोनाल्डोचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल आणि तो व्यावसायिक लीग खेळत असलेला स्पेन हे एकाच गटात आले आहेत. 

मॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसमोरील पेच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉने बिकट केला आहे. रोनाल्डोचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल आणि तो व्यावसायिक लीग खेळत असलेला स्पेन हे एकाच गटात आले आहेत. 

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ मॉस्कोतील एका खास कार्यक्रमात काढण्यात आला. जागतिक महासंघाच्या प्रथेनुसार केवळ फुटबॉलवरच भर देत हा सोहळा झाला. या स्पर्धेचा ड्रॉ स्पेनसाठी खडतर असणारे असे मानले जात होते आणि तेच घडले आहे. स्पेनमधील अनेक फुटबॉलप्रेमींसाठी रोनाल्डो हिरो आहे. स्पेनची गटातच रोनाल्डोची जन्मभूमी असलेल्या पोर्तुगालविरुद्ध लढत होईल. या सामन्यातील रोनाल्डोच्या कामगिरीवर चाहत्यांचीही परीक्षा लागणार आहे. ही लढत 15 जूनला होईल. 2012 च्या युरो स्पर्धेतील उपांत्य लढतीनंतर दोघांत एकही सामना झालेला नाही. स्पेनसाठी वाईट बाब म्हणजे त्यांची स्पर्धेतील लढत दुसऱ्या दिवशी युरोपियन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आहे. 2014 च्या स्पर्धेत स्पेनला युरोपातील नेदरलॅंडविरुद्ध हार पत्करावी लागली आणि ते साखळीत बाद झाले होते. 

दरम्यान, गतविजेत्या जर्मनीच्या गटात ग्रुप ऑफ डेथ समजले जात आहे. या गटात मेक्‍सिको, दक्षिण कोरिया; तसेच धोकादायक स्वीडन आहेत. जर्मनीची बाद फेरी नक्की असली, तरी अन्य तीन संघांत कडवी चुरस अपेक्षित आहे. ब्राझील असलेल्या ई गटातून स्वित्झर्लंड आगेकूच करण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडसमोर गटात बेल्जियमचे आव्हान असेल. लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिनाच्या गटात जेमतेम 33 लाख लोकसंख्या असलेला आइसलॅंड आहे. 

स्पर्धेची गटवारी 

  • अ गट : रशिया, सौदी अरेबिया, उरुग्वे, इजिप्त 
  • ब गट : पोर्तुगाल, स्पेन, मोरोक्को, इराण 
  • क गट : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क 
  • ड गट : अर्जेंटिना, आइसलॅंड, क्रोएशिया, नायजेरिया 
  • इ गट : ब्राझील, स्वित्झर्लंड, कोस्टा रिका, सर्बिया 
  • फ गट : जर्मनी, मेक्‍सिको, स्वीडन, दक्षिण कोरिया 
  • ग गट : पोलंड, कोलंबिया, सेनेगल, जपान

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news Spain‬ Russia‬ FIFA World Cup‬ Argentina national football team‬ FIFA‬ Moscow‬‬ Cristiano Ronaldo