मॅटेराझी यांचा चेन्नईयीनला निरोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 March 2017

चेन्नई - इटलीचे विश्‍वकरंडक विजेत्या संघातील फुटबॉलपटू मार्को मॅटेराझी यांनी इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षकपद सोडले आहे.

चेन्नई - इटलीचे विश्‍वकरंडक विजेत्या संघातील फुटबॉलपटू मार्को मॅटेराझी यांनी इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षकपद सोडले आहे.

क्‍लब आणि मॅटेराझी यांनी परस्परांच्या सहमतीने हा निर्णय घेतला. लीगच्या प्रारंभापासून तीन मोसम त्यांच्याकडे सूत्रे होती. पहिल्या मोसमात ते खेळाडू-प्रशिक्षक होते. ते सात सामनेसुद्धा खेळले. तेव्हा चेन्नईयीनने साखळी टप्प्यात अव्वल स्थान मिळविले होते. उपांत्य फेरीत चेन्नईयीनला केरळा ब्लास्टर्सकडून पराभूत व्हावे लागले होते. दुसऱ्या मोसमात चेन्नईयीनने अंतिम फेरीत एफसी गोवा संघाला 3-2 असे हरवून विजेतेपद मिळविले. मॅटेराझी हे आयएसएलमधील सर्वाधिक विजय मिळविलेले प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले, की चेन्नईयीनबरोबरचे तीन मोसम खेळाडू तसेच व्यक्ती म्हणून माझ्यासाठी फार धाडसी ठरले. ही संधी दिल्याबद्दल मी क्‍लबचा आभारी आहे. भारतीय फुटबॉलला दिशा देण्यासाठी मी थोडे योगदान देऊ शकलो याचे समाधान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marco materazzi send un in chennai