मॅराडोनापेक्षा मेस्सी  सरस - सर्जिओ रॅमॉस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पेले आणि मॅराडोना यांच्यापैकी श्रेष्ठ कोण ही चर्चा नेहमीच रंगते; पण स्पेनचा कर्णधार सर्जिओ रॅमॉस याने मॅराडोनापेक्षा लिओनेल मेस्सी सरस असल्याचे मत व्यक्त केले.

कझान - पेले आणि मॅराडोना यांच्यापैकी श्रेष्ठ कोण ही चर्चा नेहमीच रंगते; पण स्पेनचा कर्णधार सर्जिओ रॅमॉस याने मॅराडोनापेक्षा लिओनेल मेस्सी सरस असल्याचे मत व्यक्त केले.

अलीकडेच मॅराडोना यांनी रॅमॉस सुपरस्टार नसून सर्वोत्तम बचावपटू म्हणून उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडीन याचा उल्लेख केला होता. या पार्श्‍वभूमीवर रॅमॉसने दिग्गज मॅराडोना यांना प्रत्युत्तर दिले. रॅमॉस रेयाल माद्रिदचे प्रतिनिधित्व करतो. मेस्सीचा बार्सिलोना त्यांचा कडवा प्रतिस्पर्धी आहे. यानंतरही रॅमॉस म्हणाला, की मेस्सीच्या तुलनेत मॅराडोना अनंत वर्षे पिछाडीवर आहेत. 

Web Title: Messi is best than Maradona says Sergio Ramos