देव आमच्यासोबत, तो आम्हाला निराश करणार नाही : मेस्सी

वृत्तसंस्था
Wednesday, 27 June 2018

सेंट पिटर्सबर्ग : मंगळवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने नायजेरियाविरुद्ध विजय मिळवत फुटबॉल विश्वकरंडकातील आपले आव्हान कायम ठेवले. या विजयानंतर मात्र अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी भाऊक झाला होता. 

''देव आमच्या सोबत कायम आहे याची आम्हाला खात्री होती आणि तो आम्हाला निराश करणार नाही हे हेही माहीत होते.'' या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. या सामन्यादरम्यान सर्व खेळाडूंना प्रचंड तणाव सहन करायला लागल्याचे त्याने कबूल केले. 

मेस्सीची पेनल्टी चुकल्यानंतर संघातील सर्वांना बाद फेरीतील प्रवेशाबद्दल साशंकता जाणवायला लागल्याचे अर्जेंटिनाचे व्यवस्थापक जॉर्ज सॅमपोली यांनी मान्य केले. तसेच मेस्सीबद्दल बोलताना ते म्हणाले, ''आम्ही मेस्सीला जास्तीत जास्त पास द्यायला हवेत, नाहीतर आम्हाला नुकसान सहन करावे लागेल. आमच्या संघात जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याचा आम्हाला फायदा घेता यायला हवा.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Messi gets emotional after win