कोलकात्यात मेस्सीच्या चाहत्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
Wednesday, 4 July 2018

पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फ्रान्सकडून उपउपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव त्याला सहन झाला नाही. शनिवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात सामना झाला.
 

कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फ्रान्सकडून उपउपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव त्याला सहन झाला नाही. शनिवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात सामना झाला.

अर्जेंटिनाचा पराभव झाल्यावर जेवण न करता तो आपल्या बेडरूमध्ये गेला. रविवारी सकाळी अनेक प्रयत्न करूनही त्याने दरवाजा उघडला नाही. अखेर पोलिसांची मदत घेण्यात आली. दरवाजा उघडल्यानंतर मोनोतोषने गळफास घेतल्याचे दिसून आले. माझ्या मुलाला कोणताच आजार नव्हता. तो अर्जेंटिना आणि मेस्सीचा फार मोठा चाहता होता. विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून तो टीव्हीसमोरच असायचा. अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर तो निराश झाला होता; परंतु आत्महत्या करेल, असे आम्हाला अजिबात वाटले नाही, असे मत मोनोतोषच्या वडिलांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Messis fan suicides in Kolkata