esakal | कोरियाच्या आनंदात मेक्‍सिकनचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

Mexican Fans Celebrate South Korea's Victory Over Germany

दक्षिण कोरियाने विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अखेरच्या साखळी लढतीत जर्मनीस हरवले. त्यामुळे मेक्‍सिकोची बाद फेरी निश्‍चित झाली. कोरियाच्या या जल्लोषात मेक्‍सिकन सहभागी झाले एवढेच नव्हे, तर त्यांनी कोरियन्सना तुम्ही आता आमचे खास मित्र आहात, असेच सांगितले. 

कोरियाच्या आनंदात मेक्‍सिकनचा सहभाग

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेक्‍सिको सिटी - दक्षिण कोरियाने विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अखेरच्या साखळी लढतीत जर्मनीस हरवले. त्यामुळे मेक्‍सिकोची बाद फेरी निश्‍चित झाली. कोरियाच्या या जल्लोषात मेक्‍सिकन सहभागी झाले एवढेच नव्हे, तर त्यांनी कोरियन्सना तुम्ही आता आमचे खास मित्र आहात, असेच सांगितले. 

स्वीडनविरुद्ध पराजित झाल्यावर मेक्‍सिको चाहत्यांनी बाद फेरीची आशाच सोडली होती; पण कोरियाने त्यांना जीवदान दिले. मेक्‍सिकोतील कोरियन दूतावासासमोर कोरियाच्या जल्लोषात मेक्‍सिकनही सहभागी झाले. मेक्‍सिको आणि कोरियन पाठीराख्यांत फरकच दिसत नव्हता, असे कोरियाचे मेक्‍सिकोतील राजदूत ब्यांग यिन हान यांनी सांगितले. कोरियाच्या या विजयात दूतावासातील मेक्‍सिकन कर्मचारीही आनंदाने सहभागी झाले. 

कोरियन दूतावासासमोर शेकडो मेक्‍सिकन चाहत्यांनी गर्दी केली. ते दोन्ही देशांचे ध्वज फडकवत होते. कोरियन आता मेक्‍सिकन झाले आहेत, असेही ते सांगत होता. कोरियाच्या दूतावासासमोर सुरू झालेला जल्लोष काही वेळातच मेक्‍सिकोत पसरला. मेक्‍सिकन दिसणाऱ्या प्रत्येक आशियाई व्यक्तीचे आभार मानत होता. एवढेच नव्हे तर दोन्ही देशांचे ध्वज एकत्र फडकत असल्याचे ट्विटही झाले.