मेक्‍सिकोच्या स्टारने हाणला नेमारला टोमणा 

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

मैदानावर पडण्याच्या नेमारच्या "स्टाइल'चा मेक्‍सिकोने वेळोवेळी तीव्र निषेध केला आहे. नाटकी नेमारवर पंचांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे बाद फेरीच्या सामन्यापूर्वी मेक्‍सिकोचा कर्णधार आंद्रेस गुआर्डाडो याने म्हटले होते.

ब्राझीलने हा सामना जिंकल्यानंतर नेमारने त्यास प्रत्युत्तर दिले होते. मेक्‍सिकोच्या संघाला उद्देशून तो म्हणाला होता, की "ते फारच बडबड करीत होते.

आता त्यांना घरी परत जावे लागत आहे.' ब्राझीलचे आव्हान आटोपल्यानंतर गुआर्डाडोने याची परतफेड केली. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की, "...आणि आता कोण घरी परत जातेय?' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mexicos star criticise neymar