इजिप्तच्या सालाचा सहभाग संदिग्ध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 May 2018

लंडन - इजिप्त ३८ वर्षांनंतर प्रथमच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणार असले, तरी त्यापूर्वीच त्यांच्या आशांना धक्का बसला आहे. खांद्याच्या  दुखापतीमुळे त्याला किमान चार आठवडे तरी मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.

चॅंपियन्स लीग स्पर्धेतील अंतिम सामना मो साला आणि पर्यायाने इजिप्तला चांगलाच महागात पडला आहे. लिव्हरपूलकडून खेळताना सालाच्या खांद्याला दुखापत झाली असून, लिव्हरपूलच्या फिजिओच्या मते त्याला किमान चार आठवडे मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्यास आता अवघे १४ दिवस उरले असताना, सालाच्या तंदुरुस्तीचा प्रश्‍न इजिप्तसाठी ऐरणीवर आला आहे. फिजिओ रुबेन पॉन्स म्हणाले, ‘‘जे झाले ते दुर्दैवी आहे. त्याने वेळेत तंदुरुस्त व्हावे, यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत.’’ इजिप्तचा ‘अ’ गटात समावेश असून, पहिलाच सामना त्यांचा उरुग्वेशी (१५जून) होणार आहे. त्यामुळेच मुख्य फेरीत नेणाराच साला याच्या उपलब्धतेविषयी संदिग्धता असल्याने इजिप्त संघ व्यवस्थापन काळजीत पडले आहे. 

सर्वसाधारणपणे सालाची दुखापत बरी  होण्यास चार आठवड्यांचा कालावधी लागतोच. पण, एकूणच विश्‍वकरंडकाचे महत्त्व लक्षात घेता कमीत कमी दिवसांत त्याला तंदुरुस्त करण्याचे आमच्यासमोर आव्हान आहे. 
- रुबेन पॉन्स, लिव्हरपूल संघाचे फिजिओ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mo salah egypt football