नेमारच्या विश्रांतीमुळे ब्राझीलची चिंता वाढली

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

ब्राझील संघाला पहिल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. आता दुसऱ्या फेरीचा सामना असताना त्यांचा प्रमुख आधारस्तंभ नेमारने सराव सत्रात सहभाग न घेतल्यामुळे ब्राझीलची चिंता वाढली आहे. 
 

सोची - ब्राझील संघाला पहिल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. आता दुसऱ्या फेरीचा सामना असताना त्यांचा प्रमुख आधारस्तंभ नेमारने सराव सत्रात सहभाग न घेतल्यामुळे ब्राझीलची चिंता वाढली आहे. 

नेमारच्या उजव्या पायाची टाच दुखावल्याचे ब्राझील संघ प्रवक्ता विनिसियस रॉड्रिगेज यांनी सांगितले. स्वित्झर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ब्राझीलला 1-1 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. या वेली स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी सातत्याने नेमारला लक्ष्य करून त्याला कायम अडथळे आणले. या दरम्यान तो अनेकदा मैदानावर पडला. त्यामुळे त्याची टाच दुखावल्याचे समजते. 

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ज्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्या पायाला नाही, तर त्याच्या दुसऱ्या पायाला ही दुखापत झाली आहे. 

नेमारला जेव्हा दुखापतीची कल्पना आली, तेव्हा तो तातडीने फिजियोकडे गेला. फिजियोने त्याची दुखापत तपासून पाहिली. आज ही तो फिजियोच्या देखरेखीखालीच होता. त्यामुळे सरावाला उतरला नाही. संघ सराव झाल्यावर मात्र ब्राझील संघ सेंट पीटसबर्गला रवाना झाला. त्यांचा पुढील सामना शुक्रवारी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neymar's rest raise tensions for Brazil